Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या विजय जाधव च्या अडचणीत वाढ, पत्नी मेघनाने केल्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी, मुख्यकार्यकारी...

विजय जाधव च्या अडचणीत वाढ, पत्नी मेघनाने केल्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी, मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली ही मागणी

0
2521

जामखेड न्युज——

विजय जाधव च्या अडचणीत वाढ, पत्नी मेघनाने केल्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी, मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली ही मागणी

 

जामखेड तालुक्यातील मोहा येथे कार्यरत शिक्षक विजय सुभाष जाधव यांच्या पहिल्या पत्नीने पतीवर अनेक गंभीर आरोप केले असून सदर शिक्षकास सेवेतून बडतर्फ करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. स्त्रीलंपट, गुंड प्रवृतीचा असून पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न केल्यामुळे तसेच दि.१२ एप्रिल २०२२ रोजी माझी बदनामी केल्यामुळे विजय सुभाष जाधव यांच्या विरोधात देहूरोड पोलीस स्टेशन येथे भा. द. वि कलम 494/500 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. अशीही माहिती तक्रारदार महिला व शिक्षक विजय जाधव यांच्या पत्नी मेघना विजय जाधव यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, यातील तक्रारदार महिला व देहूरोड पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्यातील फिर्यादी मेघना विजय जाधव यांचे जामखेड तालुक्यातील मोहा जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक विजय सुभाष जाधव यांचे यांचेबरोबर २० मे २००६ रोजी लग्न झालेले असून त्यांना तनुश्री नावाची एक मुलगी असून बारावीत शिकत आहे. गेली अनेक वर्षापासून विजय जाधव हे पत्नी मेघना व मुलगी तनुश्री हीचा सांभाळ करत नाहीत. लग्नाला अवघे वर्षही झाले नव्हते तेव्हा विजय जाधव यांनी एका शिक्षिकेस घरात आणले माझा संस्कार उध्वस्त करण्यात तिचा देखील सहभाग आहे. असाही आरोप मेघना जाधव यांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मेघना जाधव यांनी सांगितले की , माझे पती विजय जाधव यांचा माझ्याशी घटस्फोट झालेला नाही. तरी देखील त्यांनी एका शिक्षिके बरोबर दुसरे लग्न केले आहे. त्यांना ४ ते ५ वर्षाची मुलगी आहे. या संदर्भात माझे वडील व्ही. के. गायकवाड रा. देवीइद्रायणी सोसायची तळवडे जि. पुणे यांनी अनेक वेळा तक्रार केली तसेच माहितीअधिकार कायद्यानुसार अनेक वेळा अर्ज करून माहिती मागितली परंतु संबंधितांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही.कारण विजय जाधवच्या मागे कोणीतरी वरदहस्त असल्याने हा प्रकार घडत आहे. असाही आरोप तक्रारदार मेघना जाधव यांनी केले आहेत.

शासन नियमानुसार पहिली पत्नीचा घटस्फोट झाल्याशिवाय दुसरे लग्न करता येत नाही तरीही विजय जाधव यांनी दुसरे लग्न करून त्यांना आपत्यही झाले आहे. त्यामुळे माझ्यावर ( मेघना विजय जाधव ) अन्याय झाला असून त्यांनी पत्नी व मुलीचा सांभाळ करत नाही. त्यांचबरोबर त्यांनी कधीही तनुश्री विजय जाधव ही त्यांची मुलगी असून देखील तिला कधी विचारणा केली नाही व तिच्या शिक्षणाबाबत कधीही कुठल्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारली नाही. विजय सुभाष जाधव हे स्त्रीलंपट असून गुंड प्रवृत्तीचे आहेत. पहिली पत्नी हयात असून एक शिक्षिका तिच्याबरोबर त्यांनी अनैतिक संबंध ठेवले. असल्याचा आरोपही सदर शिक्षकाची पत्नी असलेल्या मेघना विजय जाधव यांनी केला आहे.

विजय सुभाष जाधव हे शिक्षक सेवक कालावधीमध्ये जिल्हा परिषद शाळा कोसेगव्हाण येथे कार्यरत असताना अनाधिकृत गैरहजर राहून एका शिक्षिकेला हिला भेटायला जात असतं. व न्यायालयात देखील हजर राहून प्रशासनाची दिशाभूल करत असतं असेही अरोप यापूर्वी यांच्यावर अनेक प्रशासकीय कारवाही झालेली आहे. अशीही माहिती सदर निवेदनात देण्यात आली आहे
तसेच आमची मुलगी तनुश्री विजय जाधव ही सद्यस्थितीत
बारावी सायन्सला शिकत आहे तिच्या जातपडताळणी साठी तिचे वडील विजय सुभाष जाधव यांचे कागदपत्रांची आवशक्यता आहे . मात्र तनुश्री ने अनेक फोन करून कागदपत्रांची मागणी केली परंतु त्यांनी कागदपत्र दिली नाहीत. दरम्यान विजय जाधव यांनी दहावीपर्यतचे शिक्षण घेतलेल्या निमगाव म्हाळुंगे शिऊरफाटा येथील आश्रम शाळेतही संपर्क केला व येथील मुख्याध्यापिका काळे मॅडम यांना मी विजय जाधवची पत्नी असे सांगितले व विजय जाधव यांच्या दहावीच्या दाखल्याची मागणी केली तर सदर मुख्याध्यापिका यांनी सहकार्य न करत दाखले देण्यास विजय सुभाष जाधव यांनी विरोध केला आहे असे मला सांगण्यात आले. तुम्ही थर्डपर्सन आहेत आम्ही तुम्हाला दाखले देऊ शकत नाहीत असे सांगितले .शिक्षिका असूनही एका विद्यार्थिनीच्या शिक्षणास अडथळे निर्माण करणारे शिक्षक सुद्धा गुन्ह्यात पात्र आहेत. माझ्याआयुष्याशी खेळणारे विजय सुभाष जाधव व एक शिक्षिका हे दोन्हीही गुन्ह्यात पात्र आहे. असे निवेदनात म्हंटले आहे. तरी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मेघना जाधव यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!