जामखेड न्युज——
सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारी वरून गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या शाळा भेटीत तीन शिक्षक गैरहजर!!
आता गटशिक्षणाधिकारी काय कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष
तालुक्याच्या शैक्षणिक विकासासाठी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी काम करणाऱ्या शिक्षकांवर कौतुकाची थाप तर कामचुकार शिक्षकांवर कारवाईचा बडगा उचलत काम सुरू केले, कामचुकार शिक्षकांना तोंडी समज देऊन जर वर्तनात बदल झाला नाही तर कारवाई चा बडगा उचलला आहे. मोहा ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेल्या तक्रारी वरून जिल्हा परिषद मोहा शाळेस भेट दिली असता तीन शिक्षक गैरहजर आढळले.आता गटशिक्षणाधिकारी काय कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दि. 23 एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा ता. जामखेड येथील शिक्षक वारंवार शालेय कामी गैरहजर राहतात, मुलांना शिकवत नाहीत अशा तक्रारी मोहा गावचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्या येणाऱ्या वारंवार तक्रारीवरून गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी मोहा शाळेला सकाळी अचानक भेट दिली असता पारखे मल्हारी आप्पा, साखरे रजनीकांत रोहिदास, जाधव विजय सुभाष हे शालेय कामी गैरहजर दिसून आले.
यापूर्वीही हेच शिक्षक शालेय कामी गैरहजर दिसून आले होते. त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात व कामकाजात बदल झाला नाही.
मार्च 2024 रोजी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, यांनी शाळेची वार्षिक तपासणी केली असता सर्व मुले अप्रगत दिसून आले. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आले.
सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी संबंधित शिक्षकांवर कारवाई ची मागणी केली असून आता गटशिक्षणाधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.