जामखेड न्युज——
लंकेच्या लाटेत विखेचा डोंगर भुईसपाट होणार – जयसिंगराव गायकवाड
साकतमध्ये हाॅटेल रायगडचे त्यांच्या हस्ते उद्घाटन
नगर लोकसभा मतदारसंघात एकीकडे सर्वसामान्य तुमच्या आमच्या तील सर्वाच्या हाकेस आव देणारा सुखदुखात सहभागी होणारा निलेश लंके यांच्या रुपाने उमेदवार तुमच्या पुढे आहे तर दुसरीकडे प्रचंड पैसा, धनदौलत असणारा उमेदवार कधीही तुमच्या मदतीला धावून येणार नाही. फोन घेणार नाही असा विखे आहे. तुम्ही पाच वर्षे अनुभव घेतला आहे. यामुळे मतदारसंघात लंकेची प्रचंड लाट आहे जनतेनेच निवडणूक हातात घेतली आहे. विखेचा पैसा व धनदौलतीचा डोंगर लंकेच्या लाटेत भुईसपाट होणार आहे. असे मत माजी मंत्री व माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी साकत येथे हाॅटेल रायगड च्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी हॉटेल रायगडचे उद्घाटन माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्या हस्ते झाले यावेळी
जिल्हा परिषदचे माजी सदस्य दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, विश्वनाथ राऊत, पारनेर सैनिक बँक संचालक दत्तात्रय सोले, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, कुंडल राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष प्रशांत राळेभात, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, शहादेव वराट, रामचंद्र वराट गुरूजी, पोलीस पाटील महादेव वराट, सुरेश वराट, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, विठ्ठल वराट, विनोद वराट, प्रा. भागवत वराट, भरत लहाने, नानासाहेब लहाने, अविन लहाने, कांतीलाल वराट, परमेश्वर वराट, दादासाहेब वराट, हनुमंत वराट, पांडुरंग वराट, प्रविण वराट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, नागराज मुरूमकर यांनी ही उद्घाटन कार्यक्रमास भेट दिली.
यावेळी बोलताना जयसिंगराव गायकवाड म्हणाले की, लंकेच्या प्रचाराची सुरूवात हाॅटेल रायगड वरून करत आहोत म्हणजे आपली तुतारी निश्चितच वाजणार आहे. संपूर्ण राज्याने कोरोना काळात लंके यांचे काम पाहिले आहे. त्यावेळी विखे घरात होते लंके लोकांना दिलासा आधार देत होते. सर्वात मोठे कोवीड सेंटर त्यांनी चालवले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपला देश कृषी प्रधान आहे. तरीही शेती मालाला भाव नाही. शेतकरी हाल अपेष्टा सहन करत आहे. आदानी अंबानी देश चालवत आहेत. त्यांचे कर्ज माफ होत आहे. आपणास कर्जमाफी नाही. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या भाजपास यावेळी मतदानाच्या रूपाने झटका दाखवणे आवश्यक आहे.
मोदी सरकार ईडीचा गैरवापर करत आहे. आदानी अंबानी यांचे कर्जे माफ करत आहे. शेतकऱ्यांना कसलीही मदत करत नाही. भ्रष्टाचाराचा आरोप करत ईडीचा धाक दाखवून सत्ता मिळवत आहेत हे योग्य नाही.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावित संजय वराट यांनी केले तर आभार विठ्ठल वराट यांनी मानले.