जामखेड न्युज——
जामखेडमध्ये महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी
शांतिदूत युग प्रधान आचार्य श्री महाश्रमन जी महाराज यांचे प्रवचन
सकल जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये शांतिदूत युग प्रधान आचार्य श्री महाश्रमन जी महाराज साहेब यांचे सर्व धर्मीय प्रवचन, भव्य रँली तसेच महामंगलपाठ असे असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे झाले.
यावर्षी विशेष महत्त्व प्राप्त झाले कारण शांतिदूत युग प्रधान आचार्य श्री महाश्रमन जी महाराज साहेब हे राष्ट्रीय संत असून भारतीय जैन तेरपंथ समाजाचे आचार्य आहेत मानवता हाच धर्म आणि व्यसनमुक्ती पासून भारताची सुटका हे प्रमुख उपदेश घेऊन संपूर्ण भारतात प्रत्येक तालुका शहर या ठिकाणी जाऊन उपदेश पर व्याख्यान आणि मार्गदर्शन करीत आहेत.
मागील सहा महिन्यांपासून जामखेड जैन श्रावक संघ यांच्या आग्रहामुळे महाराज साहेब महावीर जयंती उत्सव निमित्त जामखेड शहरामध्ये आगमन झाले हे सुवर्णयोग एखाद्या राष्ट्रीय संत जामखेड मध्ये प्रथमच आले आहे ही संपूर्ण जामखेड शहरवासीयांकरिता एक अभिमानाची गोष्ट आहे.
तरी महावीर जयंती उत्सव कार्यक्रमांमध्ये सकाळी शासकीय विश्रामगृह येथून मिरवणूक काढण्यात आली व जामखेड महाविद्यालय येथे महाराज गुरुवर्य यांचे व्याख्यान झाले संपूर्ण कार्यक्रम साठी राजकीय ,सामाजिक व सर्व क्षेत्रातील जामखेड शहरातील सर्व जाती धर्माच्या जनतेने उपस्थिती लावली .आचार्य श्रींचे प्रवचन झाल्यानंतर माननीय नामदार रामजी शिंदे साहेब यांचे भाषण झाले तसेच राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख मधुकर आबा राळेभात यांचेही भाषण झाले. जामखेड जैन श्रावक संघ अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सेक्रेटरी व सर्व ट्रस्टींनी सर्वांचे आभार मानले. विशेषत हे कार्यक्रम पूर्ण व्यवस्थित पार पाडण्यासाठी धर्मोदय एकता मंच ,आदिनाथ युवा मंच व महिला मंडळ यांनी विशेष सहकार्य केले.
जामखेडच्या इतिहासातील हा जैन श्रावक संघ व जैन समाजाचा हा सर्वात मोठा कार्यक्रम झाला असून अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी व सर्वच ट्रस्टींनी यासाठी खूप मेहनत घेतली व जयंती उत्सव यशस्वी पार पाडला