जामखेड न्युज——
जामखेड मिलिंदनगर भागातील महिलांचे विजेसाठी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन
अधिकारी नाँट रिचेबल

गेल्या अनेक दिवसांपासून जामखेड शहरासह
मिलिंदनगर, सदाफुले वस्ती, शिवाजीनगर भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. कमी दाबाने वीजपुरवठा अचानक उच्च दाबाने वीजपुरवठा यामुळे इलेट्रिक उपकरणे नादुरुस्त होणे, सतत फ्युज उडणे यामुळे संतप्त झालेल्या मिलिंदनगर भागातील शेकडो महिला, मुले यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पण कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नव्हते सुमारे दोन तास महिलांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. महावितरणचे अधिकारी मात्र नाँट रिचेबल होते.

जामखेड शहरासह अनेक दिवसांपासून मिलिंदनगर, सदाफुले वस्ती व शिवाजीनगर भागात वीचेचा सतत लपंडाव सुरू असतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. प्रंचड उकाडा सुरू आहे. यामुळे फँनशिवाय घरात बसू शकत नाहीत. पण लाईट सतत जाते येते. यामुळे नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.

महावितरण कडून अव्वाच्या सव्वा बील वसुल केले जाते पण सेवा मात्र मिळत नाही. फ्युज गेली तर लवकर टाकली जात नाही. लाईट जाणार आहे याची सूचना दिली जात नाही. तसेच अधिकारी फोन उचलत नाहीत यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. शुक्रवारी सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत संपूर्ण शहरात लाईट बंद होती. पण महावितरण ने सकाळी आठ ते सात पर्यंत लाईट बंद चा मेसेज टाकला होता मात्रशनिवारी काही भागात दिवसभर लाईट बंद होती तसेच सायंकाळी पाच ते नऊ पर्यंत लाईट बंद होती आगोदर सूचना दिली नव्हती सूचना न देता अनेक वेळा लाईट गुल होत आहे.

शेकडो महिला व मुले यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले पण एकही अधिकारी तेथे उपलब्ध नव्हते. एक दोन वायरमन होते ते म्हणाले आष्टी वरून लाईट गेलेली आहे.

शेकडो महिलांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले पत महावितरण कार्यालय अंधारात होते. तेथेच लाईट नव्हती. लाईटचे सुरळीत व उच्च दाबाने वीजपुरवठा होईल असे अधिकारी यांनी आश्वासन द्यावे अशी मागणी महिला करत होत्या पण रात्री नऊ वाजेपर्यंत लाईट आलेली नव्हती अधिकारी नव्हते महिला व मुले कार्यालयात ठिय्या मांडून होते.





