जामखेड न्युज——
महामानवास सिध्दार्थ नगर येथे अभिवादन
जामखेड येथे विविध ठिकाणी जयंती निमित्त अभिवादन
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त जामखेड शहरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले शहरातील सर्वांत जुनी बौद्ध वस्ती असलेली सिध्दार्थ नगर भागात महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.महेश पाटील साहेब माजी नगरसेवक अमित चिंतामणी,अमित गंभीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, भिमटोला ग्रुपचे अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड,राजन संमिदर सर, माजी संचालक सागर सदाफुले,आजिनाथ शिंदे, दादासाहेब घायतडक,अशोक घायतडक,रंजन मेघडंबर,जाॅकी सदाफुले,वनविभागाचे अधिकारी बाळासाहेब घायतडक,बौद्धाचार्य बलभीम जावळे,सचिन सदाफुले,संतोष थोरात,बाळु काकडे,प्रमोद सदाफुले,आदी उपस्थित होते.
जयंतीच्या पूर्वसंध्येला 13 एप्रिल रोजी महिला मंडळानी पुढाकार घेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.रोहीणी विकी सदाफुले होत्या..सहभाग घेण्यार्या महिला सौ.उषा मुरलीधर सदाफुले व सौ.ज्योती शेखर घायतडक यांना जयंती दिनी धम्मप्रणाली पैठणी साडी बक्षीस म्हणून वितरीत करण्यात आली तसेच लहान मुलांना एक वही एक पेन वाटप करुन अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन सौ.शिल्पा तिजोरे,मानसी घायतडक, यांनी केले होते.
कार्यक्रम यशस्वीसाठी सिध्दार्थ नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष मनीष घायतडक, रोहीत राजगुरु,अजित घायतडक, अक्षय गायकवाड, अक्षय घायतडक, विशाल निकाळजे,नितीन सदाफुले,दिपक सदाफुले,रोहीत सदाफुले,प्रतिक निकाळजे,हर्षवर्धन घायतडक,सनी घायतडक, आदींनी परिश्रम घेतले