जामखेड न्युज——
कार रसवंतीगृहात घुसल्याने साकत येथील महिलेचा मृत्यू
पुणे नगर रस्त्यावर सेलीरिओ फलके मळा इथे भरधाव जाणारी कार कार क्रमांक MH 12UJ 9586 चालकाचे नियंत्रण सुटल्याने नगर रस्त्यावर असलेल्या रसवंतीच्या दुकानांमध्ये कार शिरली, अपघात इतका भयंकर होता की रसवंती मधील महिला पारुबाई वराट यांचा जाग्यावरच मृत्यू झाला तर गाडीतील तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
गाडीतील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघात होताच स्थानिक लोकांनीजखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पूर्वीच पारुबाई सखाराम वराट यांचे निधन झाले आहे.
दि. 06/04/2024 रोजी दुपारी 02/20 वा. चे सुमारास मौजे फलकेमळा कारेगाव ता.शिरूर गावचे हद्दीत पुणे ते अहमदनगर जाणारे हायवे रोडचे खाली साईदत्त हॉटेल जवळ एक लाल रंगाची सेलीरिओ कार नं. एम एच 12/यु जे /9586 वरील चालकाने नाव पत्ता माहीत नाही. याने त्यांचे ताब्यातील कार हायगईने अविचाराने रस्त्याचे
परीस्थिती कडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवुन रोडचे खाली जावुन ऊसाचे रसाचे दुकानात घुसल्याने पारुबाई सखाराम वराट यांना जोराची धडक देत जवळच्या झाडांवर आदळली.
मयत पारुबाई वराट यांचा मुलगा अशोक वराटने दिलेल्या फिर्यादी वरून रांजणगाव जि. पुणे पोलीस स्टेशनला सेलीरिओ कार नं. एम एच 12/यु जे/9586 वरील चालकाने नाव पत्ता माहीत नाही. यांचे विरूध्द कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दाखल अंमलदार- पो हवा मोरे ब. नं 1840 तपासी अंमलदार- पो स ई पासलकर यांच्या कडे आहे.
चौकट
फिर्यादी अशोक सखाराम वराट यांने सांगितले की,
सेलीरिओ कारचा नंबर तपासणी केल्यानंतर कारवर असणारा नंबर कारचा नाही तो खोटा नंबर आहे.
यामुळे कारची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी फिर्यादी यांने केली आहे.