Friday, February 13, 2026
Home राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जामखेड तालुका उपाध्यक्षपदी बापुसाहेब शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जामखेड तालुका उपाध्यक्षपदी बापुसाहेब शिंदे

0
811

जामखेड न्युज——-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जामखेड तालुका उपाध्यक्षपदी बापुसाहेब शिंदे

 

जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील कार्यकर्ते
बापुसाहेब पाडुरंग शिंदे यांची राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या जामखेड तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत तळमळीने पक्षाचे काम करत होते पक्षाने उपाध्यक्ष पद देऊन त्यांच्या कामाला न्याय दिला आहे.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहटा यांनी पत्राद्वारे बापुसाहेब पाडुरंग शिंदे यांची राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या जामखेड तालुका उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र दिले आहे. यामुळे शिंदे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


नाहटा यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,आपली जामखेड तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जामखेड तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे.


मा. नामदार अजितदादा पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांचे पक्ष वाढीसाठी व पक्षाचे सर्व ध्येय धोरणे सर्व सामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी आपले पक्षाला सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. आपल्या कार्यास शुभेच्छा. असे पत्रात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, उपाध्यक्ष बापुसाहेब शिंदे हे तालुक्याची कार्यकारीणी जाहीर करतील. व निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देतील अशी चर्चा आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!