जामखेड न्युज——
महेश निमोणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी निवड
अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी युवा नेते नगरसेवक महेश निमोणकर यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांनी महेश निमोणकर यांना जामखेड तालुकाध्यक्ष पदाचे पत्र दिले आहे.

पत्रात म्हटले आहे की, आपली जामखेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जामखेड तालुका अध्यक्षपदी
नियुक्ती करण्यात येत आहे. मा. नामदार अजितदादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी यांचे पक्ष वाढीसाठी व पक्षाचे सर्व ध्येय धोरणे सर्व सामान्यापर्यत
पोहचविण्यासाठी आपले पक्षाला सहकार्य राहील असा मला विश्वास आहे.

आपल्या कार्यास शुभेच्छा.आपल्या निवडीबददल आपले हार्दिक अभिनंदनआपला विश्वासू प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहाटा यांनी पत्र दिले आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ व निलेश गायवळ यांच्या मार्गदर्शनाखाली महेश निमोणकर यांचे सामाजिक व राजकीय काम सुरू आहे.



