जामखेड न्युज——
हभप तुकाराम महाराज मुरूमकर यांच्या किर्तनाने साकतमधील सप्ताहास सुरूवात

प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकतमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास काल बुधवार दि. 3 रोजी हभप तुकाराम महाराज मुरूमकर यांच्या किर्तनाने सुरूवात झाली. यावेळी त्यांनी कीर्तनासाठी पुढील अभंग घेतला होता.

धर्माची तूं मूर्ती ।
पाप पुण्य तुझे हातीं ॥१॥
मज सोडवीं दातारा ।
कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु.॥
करिसी अंगीकार ।
तरी काय माझा भार ॥२॥
जिवींच्या जीवना ।
तुका म्हणे नारायणा ॥३॥

अर्थ
हे परमेश्वरा, तू प्रत्यक्ष धर्माची मूर्ति आहेस, पाप-पूण्य घडवुन आणणे हे सर्वस्व तुमच्या हाती आहे .
या प्रपंच्यातील कर्मापासून माझी सोडवणुक करा .हे परमेश्वरा, माझा स्वीकार केल्याने तुम्हाला माझा भार होईल काय? तुकाराम महाराज म्हणतात जीवाचे जीवन असलेल्या नारायणा मी तुला विनंती करीत आहे .

सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच भागवतकथा, काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गाथा भजन, भागवतकथा हरिपाठ, किर्तन व नंतर गावजेवण व हरिजागर असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.

जामखेड तालुक्यातील साकत येथे अखंड विणा वादणास व नंदादीपास ६९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. ३ पासून सुरू झाला आहे. व बुधवार दि. १० रोजी सांगता होणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
पुढीलप्रमाणे मान्यवर कीर्तनकारांची किर्तनसेवा होईल.
आज गुरूवार दि. ४ रोजी हभप बापू महाराज दातार कोठुरेकर, ता. निफाड, नाशिक
शुक्रवार दि. ५ रोजी हभप सोमनाथ महाराज घोगरे माळशिरस
शनिवार दि. ६ रोजी हभप सौ. सोनालीताई महाराज मोरे (कापसे) आळंदी देवाची
रविवार दि. ७ रोजी सौ. वर्षाताई महाराज काळे बीड
सोमवार दि. ८ रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज पवने आळंदी
मंगळवार दि. ९ रोजी गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ
बुधवार दि. १० रोजी हभप प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याचे किर्तन होईल.
सप्ताहामध्ये दैनिक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक हभप गणेश महाराज काळवणे असतील तर दररोज पहाटे ४ ते ६ गाथाभजन, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, ३ ते ५.३० भागवतकथा, ५.३० ते ६.३० हरिपाठ, ७ ते ९ किर्तन नंतर गाव जेवन त्यानंतर हरिजागर होईल.
तसेच बुधवार दि. १० रोजी सकाळी ९ ते ११ हभप प्रकाश महाराज बोधले डिकसळ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचे काल्याचे किर्तन होईल तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संयोजक हभप भिमराव महाराज मुरूमकर व हभप बाबा महाराज मुरूमकर असतील.
गायनाचार्य म्हणून हभप हरिभाऊ महाराज काळे, हभप माऊली महाराज कोल्हे, काका महाराज निगुडे, पंढरीनाथ महाराज राजगुरू, हभप दिनकर महाराज मुरूमकर, गहिनीनाथ सकुंडे, अशोक महाराज सपकाळ व गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज फडावरील गायक मंडळी हजर राहतील.
मृदुंगाचार्य हभप भारत महाराज कोकाटे, अमोल महाराज चाकरवाडी, बाजीराव महाराज वराट, उत्रेश्वर महाराज वराट, शंकर महाराज माळी, रोहन गवळी, रोहित गवळी दिपक अडसूळ, विक्रम महाराज खुळे, सुनील भालेराव, श्रीराम भालेराव, महादेव गवळी, चोपदार आश्रू सरोदे, आजीनाथ पुलवळे आहेत.





