अनाथ मुलांचे आई- बाबा – अँड डॉ. अरूण जाधव पोलिस उपनिरीक्षक गौतम तायडे आपल्या मुलाचा वाढदिवस निवारा बालगृहात साजरा.

0
1610

जामखेड न्युज——

अनाथ मुलांचे आई- बाबा अँड डॉ. अरूण जाधवच – पोलीस उपनिरीक्षक गौतम तायडे

आपल्या मुलाचा वाढदिवस निवारा बालगृहात साजरा.

 

परिसरातील अनाथ, निराधार, वंचित, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, लोककलावंत, भटके-विमुक्त, दलित, आदिवासी घटकातील 83 मुला-मुलींच्या शिक्षणासाठी गेले 8 वर्षापासून हा प्रकल्प अँड डॉ अरुण जाधव चालवत आहेत. खरोखरच आई बाबा नसणाऱ्या मुलांचे आई बाबा होण्याचे काम अरूण आबा करत आहेत असे मत पोलिस उपनिरीक्षक गौतम तायडे यांनी व्यक्त केले.

आज दिनांक 1/ 4/ 2024 रोजी जामखेड पोलिस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक मा. गौतम तायडे साहेब यांच्या मैत्रेय या मुलांचा 9 वा वाढदिवस निवारा बालगृहातील अनाथ, निराधार, मुलांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भुमी) ता- जामखेड जि- अहमदनगर या ठिकाणी अनाथ, निराधार, वंचित, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, लोककलावंत, भटके-विमुक्त, दलित, आदिवासी घटकातील 83 मुला-मुलींच्या शिक्षणासाठी गेले 8 वर्षापासून हा प्रकल्प चालवला जातो या बालगृहाला शासनाची कोणतीही मदत मिळत नसून हे बालगृह संपूर्णपणे शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दानशूर व्यक्तींच्या मदतीतून व लोकवर्गणीतून चालवले जात आहे.


या कार्यक्रमासाठी आलेले मा. गौतम तायडे साहेब (API जामखेड पोलीस स्टेशन) यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला, तायडे साहेबांनी आपल्या मुलाचा वाढदिवस इतर ठिकाणी न साजरा करता तो खर्च टाळून निवारा बालगृहातील मुलांना एक वेळचे गोड जेवण देऊन या मुलांना एक आगळावेगळा आनंद देण्यात आला,
यावेळी बोलताना जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष साहाय्यक पोलीस निरीक्षक मा. गौतम तायडे साहेब म्हणाले की मला या ठिकाणी आल्यानंतर अगदी प्रसन्न असे वाटले मी मालेगाव जि- नाशिक येथे नेमणूकीस असताना देखील संस्थेच्या स्वयंसेवकांकडे देणगी स्वरूपात मदत देत होतो. परंतु मला आज प्रत्यक्षात माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलो असता व या मुलांकडे पाहिल्यानंतर मला माझ्या शाळेची आठवण झाली, अरुण आबा जे या गोरगरिबांसाठी काम करतात त्याचे मोल कशातच करता येणार नाही,ज्या मुलांना आई-बाबा माहित नाहीत त्या मुलांचे आई-बाबा होण्याचे काम आबा तुम्ही करतात तुमच्या कार्याला मी सलाम करतो या बालगृहात शिकणाऱ्या मुलांनी मोठे होऊन चांगले शिक्षण घेऊन अधिकारी बनलेले मला पाहायचे आहे, तरी या शहरातील लोकांनी या ठिकाणी येऊन आपला वाढदिवस साजरा करावा,व या बालगृहासाठी मदतीचा हात पुढे करावा, येणार्या पुढील काळामध्ये बालगृहातील मुलांना शिक्षणासाठी जी काही मदत लागेल ती मला सतत कळवावी, तसेच या बालगृहाच्या पुढील वाटचालीस त्यांनी भरभरुन अशा शुभेच्छा दिल्या.

तसेच बालगृहाचे अधिक्षक वैजीनाथ केसकर यांनीही मैत्रेय ला या चिल्या-पिल्याच्या वतीने वाढदिवसाच्या भर भरून शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेची संपूर्ण माहिती व्यवस्थापक संतोष चव्हाण सर यांनी दिली. 

यावेळी या वाढदिवसानिमित्त जामखेड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.गौतम तायडे साहेब,व त्यांच्या परिवारातील मान्यवर उपस्थित होते आभार दादासाहेब पुलवळे सर यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here