जामखेड तालुक्यातील रब्बी पीके ढगाळ वातावरणामुळे धोक्यात

0
180
जामखेड प्रतिनिधी
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत होणार्या हवामान बदलाचा फटका ग्रामीण भागात बसत आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांवर रोग पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जामखेड तालुक्यातील रब्बीतील पिके ढगाळ वातावरणामुळे धोक्यात सापडू लागले आहेत, ज्वारी, हरभरा, कांदे यासह अनेक पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे.
     रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा या वर्षी मोठया प्रमाणात केला आहे. मात्र, या निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांवर आळीचा प्रादुर्भाव होत आहे, ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराई पसरत आहे. तर दोन ते तीन दिवसांपासून जोरदारपणे वारा सुटल्याने ज्वारी पिके लोळू लागले आहेत. रोगराई वाढू लागली आहे. कृषी विभागाने शेतकर्‍यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज शेतकरी वर्गामधून वर्तवली जात आहे. हरभरा पाठोपाठ ज्वारी, गहू हातातून जातो की काय? अशी शेतकर्‍यांना चिंता वाटू लागली आहे. पावसाळी वातावरणामुळे निर्माण झाल्यानंतर हरभर्‍याला रासायनिक खताची मात्रा द्यावी की नाही स्थितीत निर्माण झाली आहे. रासायनिक खतांची फवारणी केली तर याचा प्रत्यक्ष पिकाला उपयोग होईल का? तसेच खतावरील खर्च वाया जाण्याची भीती शेतकर्‍यांना वाटत आहे. या वर्षी समाधानकारक वाढ झालेल्या हरभरा पिकावर पावसाळी आणि ढगाळ वातावरणात विपरीत परिणाम झाला आहे.
*रब्बी वाया जाण्याची भीती*
या वर्षी मोठ्या प्रमाणमध्ये पाऊस झाल्याने पाणी साठा मोट्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, अनेक शेतकर्‍यांनी पाणी असल्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी मोठ्या प्रमाणामध्ये पिकं घेण्यात आली होती. शेतकर्‍यांना आता चिंता वाटू लागली आहे की, पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, मुग उडिद ही पीकं तर गेलीच होती. त्यामधून सावरून आता हरभरा, ज्वारी, गहू ही पीक घेण्यात आली व जोमात आले दिसत आहे. आता हे पिकं सुद्धा वायाला जातात की काय? अशी चिंता मला वाटू लागली आहे.
*उत्पादनावर परिणाम होणार*
ढगाळ हवामानामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी थंडी चांगली पडली होती, मात्र दोन-तीन दिवसांनपासून ढगाळ वातावरणामुळे फारशी थंडी पडली नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील लागवड झालेल्या निसर्गाचा कोणताही फायदा होत नाही. या हवामानामुळे हरभरा ज्वारी या रब्बी पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here