जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
परिसरात बिबट्याची दहशत कमी होते ना होते तोच आता लांडग्याची दहशत निर्माण झाली आहे तालुक्यातील रत्नापूर परिसरातील चार व्यक्ती लांडग्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्याने आता लांडग्यांच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नापुर तालुका जामखेड येथील बाळासाहेब वारे, विमल वारे, भाऊसाहेब वारे, लक्ष्मण वारे यांना लाडगा चावला असून जबर जखमी झाले आहेत घटनेची माहिती समजतात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जखमींची विचारपूस केली सदर माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिली आणि या जखमींना प्रशासनामार्फत काही मदत करता आल्यास करावी अशी विनंती केली यावेळी ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय वाघ आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक शिंदे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नगरला पाठवण्यात आले आहे यावेळी रत्नापुर येथील ग्रामस्थांनी मदत केली.
चौकट
रत्नापूर परिसरातील चार व्यक्तींवर लांडग्याने हल्ला केला आहे. एक तर तो लांडगा पिसाळलेला असावा किंवा त्याचे पिल्ले जवळ असावेत किंवा त्यांच्यावर कोणीतरी हल्ला केलेला असावा त्यामुळे त्याने लोकांवर हल्ला केला असावा जामखेड इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नगरला हलवले आहे. नागरिकांनी सावधानता बाळगावी लांडगा दिसल्यावर त्याच्यावर हल्ला करू नये असे आवाहन वनपरिमंडळ अधिकारी अनिल खराडे यांनी केले