मोहा येथिल हापटेवाडीच्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
278
जामखेड प्रतिनिधी 
       जामखेड न्युज – –
         हापटेवाडी (मोहा) येथील योगेश रावसाहेब डोंगरे, (वय- २७) याने आपल्या शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती देवीचंद डोंगरे यांनी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली, त्यानंतर कोठारी यांनी स्वतःची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले, झाडाला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह नातेवाईकांच्या मदतीने खाली घेऊन जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणून दाखल केला यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक शिंदे यांनी पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला सदर घटनेची माहिती संजय कोठारी व देविचंद डोंगरे यांनी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना दिली असता त्यांनी आपले सहकारी पोलीस कॉ. सचिन पिरगळ आणि लाटे पोलीस यांनी पंचनामा करून पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here