जामखेड न्युज——
रत्नदीप मेडिकलचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे वर वन्य जीव संरक्षण कायद्याखालीही गुन्हा दाखल

रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या विरोधात शेकडो विद्यार्थ्यांचे गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला आहे. तरीही जोपर्यंत भास्कर मोरेला अटक होत नाही व संस्थेवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल ही भुमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. आणि आज काॅलेज परिसरात जखमी हरीण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या पथकाने चौकशी करून जखमी हरीण उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. आणि डॉ भास्कर मोरे यांनी हरीण पाळल्याबद्दल वन्य जीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे भास्कर मोरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की काल दि ९ मार्च रोजी विद्यापीठाची कमीटी तपासासाठी आली असता याच दरम्यान काॅलेजमध्ये दोन हरीण व्हीडिओ मध्ये आढळून आले. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला तोच धागा पकडून यातील काही आंदोलन कर्त्यांनी कॉलेजच्या एका खोली मध्ये हरीण असल्याचा संशय व्यक्त केला होता. परंतु कमीटीचा तपास चालु आसल्याने या गोष्टीकडे कोणीही लक्ष दिले नाही.

त्यानंतर आज दि १० मार्च रोजी वनविभागाचे वनसेवक तहेरभाई सय्यद यांना एका व्यक्तीचा फोन आला की एक हरीण रत्नदीप मेडिकलच्या आवारात जखमी असलेले हरीण आढळून आले आहे. त्यानंतर जखमी अवस्थेतील हरणास जामखेड येथिल पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी हरण दोन्ही पायांनी जखमी झाले होते. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांनी सदर हरणावर उपचार केले.

रत्नदीप मेडिकल फाउंडेशन परिसरात हरीण असल्याची माहिती वनविभागास कळली यानुसार वनविभागाने आज परिसरात येऊन पाहणी केली असता परिसरात पत्रा शेडमध्ये जखमी अवस्थेत हरीण आढळले परिसरात हरणाच्या लेंड्या सापडल्या तसेच अनेक फोटो व व्हिडिओ आमच्या केडे आले आहेत. यानुसार जखमी हरीणास उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय जामखेड येथे पाठवले व संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या विरोधात वन्य जीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वनविभागाने आज रत्नदीप मेडिकल फाउंडेशन परिसरात तपासणी केली यावेळी साहाय्यक वन संरक्षक राहुरी गणेश मिसाळ, मोहन शेळके वनपरिक्षेत्र अधिकारी कर्जत जामखेड, वनरक्षक प्रविण उबाळे, रवी राठोड, शांतीनाथ सपकाळ, नागेश तेलंग, दक्षता पथक बडे डी एम, बी एस भगत, ताहेभाई सय्यद, एस.पी डोंगरे, एस.व्ही चिलगर, एस.एन नेहरकर, आर.एस सुरवसे, एस.के सुर्यवंशी व एच .के. माळशिकारे या पथकाने सदर कारवाई केली आहे.

वन्यजीव संरक्षण कायदा म्हणजे काय?
प्राणी आणि पक्षांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकारने सन १९७२ मध्ये भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा केला होता. वन्य प्राण्यांची अवैध शिकार, मांस आणि कातडीचा व्यापार थांबवणे हा त्याचा उद्देश होता. 2003 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली. त्यानंतर त्याला भारतीय वन्यजीव संरक्षण (सुधारणा) कायदा 2002 असे नाव देण्यात आले. यामध्ये दंड आणि दंडाची तरतूद अधिक कडक करण्यात आली आहे.

3 ते 7 वर्षांपर्यंत होऊ शकते शिक्षा
वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कोणत्याही प्राण्याला कैद करून ठेवणे किंवा त्याची हत्या करणे याबाबत दोन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. वाइल्ड लाइफ अॅक्ट 1991 अंतर्गत सिंह, चित्ता, अस्वल, हरिण यांच्या नावे महत्वपूर्ण प्राण्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अशा प्राण्यांना कोणतीही संस्था किंवा व्यक्ती आपल्या ताब्यात ठेवून शकत नाही. असे केल्याचे आढळून आल्यास अटक करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्याचा नियम आहे.
कोणीही उभारू शकत नाही खासगी प्राणिसंग्रहायल
वन विभागाच्या तज्ज्ञांनुसार, कोणतीही संस्था किंवा व्यक्ती खासगी प्राणिसंग्रहायल उभारू शकत नाही. राज्य सरकारला केंद्रीय प्राणिसंग्रहायल अथॉरिटीकडून प्राणिसंग्रहायल सुरु करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. सेंट्रल झू अथॉरिटीने खूपच कडक नियम तयार केले आहेत. त्या नियमांची पूर्तता केल्यानंतरच राज्य सरकारला प्राणिसंग्रहालय सुरु करण्याची परवानगी देण्यात येते.
चौकट
सदर व्हीडिओ मध्ये दोन तर एक हरीण कॉलेजच्या मागिल बाजुस पुरण्यात आले आहे ते उकरुन काढावे अशी मागणी शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले व शिवप्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी केली. परंतु पुरण्यात आलेल्या हरणाची जागा नेमकी कोठे ते सांगावे त्या अनुषंगाने आम्ही तपास करु असे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी सांगितले आहे.



