रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षाविरोधात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर, तब्बल सहा तास आंदोलन

0
1694

जामखेड न्युज——

रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षाविरोधात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर, तब्बल सहा तास आंदोलन

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे हे प्राचार्यापेक्षा जास्त हस्तक्षेप करून विद्यार्थी व विद्यार्थिनींना मानसिक व शारीरिक त्रास देतात, विरोधात आवाज उठवला तर पेपरला बसु देणार नाही अशी धमकी देतात, तसेच आम्हाला टॉर्चर करुन ब्लॉकमधील देखील करतात असे गंभीर आरोप विद्यार्थींनी करत व होत आसलेल्या पिळवणूकी बाबत विद्यार्थींनी जामखेड तहसील कार्यालय व जामखेड पोलीस स्टेशन या ठिकाणी धडक मोर्चा काढुन ठीय्या आंदोलन केले. सदरचे ठीय्या आंदोलन तब्बल सहा तास चालले होते.

याबाबत मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थींनी जामखेड चे तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन दिले आहे. तसेच जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची देखील भेट घेऊन आपल्यावर होत आसलेल्या अन्यायाबाबत माहिती दिली. या बाबत काल मंगळवार दि ५ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता जामखेड तहसीलवर काढलेल्या मोर्चा दरम्यान विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या ठिकाणी प्राचार्या एवजी संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे हेच हस्तक्षेप करतात त्यांना तसा विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या मध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणी दिला. मेडिकल कॉलेज मध्ये कर्मचारी शिक्षकांची संख्या कमी आहे. मेडिकल कॉलेज तपासणीसाठी कमीटी आली की आम्हाला बाहेर काढतात, प्रॅक्टीकलचे तास होत नाहीत, कॉलेज भरले तर क्लास होत नाहीत फक्त बिल्डींग वर बिल्डींग बांधण्याचे काम सुरू आहे.

आम्ही ऊसतोड मजुरांची मुले आहेत विद्यार्थींची प्रचंड आर्थिक पिळवणूक या ठिकाणी डॉ भास्कर मोरे हे करत आहेत. पर सब्जेक्ट दहा हजार रुपये मागतात आमची आई वडील ऊस तोडतात पैसै कोठून आणायचे पैसै दिले नाहीत तर परीक्षेला बसु देणार नाहीत अशी धमकी डॉ मोरे देतात. आम्ही आवाज उठवायला लागलो तर तुमच्यावर केस करु असे आशी धमकी देतात.

जे विद्यार्थी डॉ मोरे यांच्या पुढे पुढे करतात त्यांना परीक्षेदरम्यान मोबाईल घेऊन बसवले जाते असा गंभीर आरोप देखील विद्यार्थींनी केला. मेंटली टॉर्चर करुन इंटर्नल मार्क कमी देतात तसेच आमच्या कडुन कसलाही मजकुर लिहुन न घेता फक्त सही करु कोरे स्टॉप देखील घेतले आहेत. तसेच मुलींचे पर्सनल मोबाईल चेक करुन त्या मध्ये काही आढळुन आले तर आम्हाला टॉर्चर करुन ब्लॅकमेल देखील करतात असा देखील गंभीर आरोप विद्यार्थीनींनी ठीय्या आंदोलन बोलताना केला आहे.

डॉ. भास्कर मोरे यांच्यावर कारवाई झाली तर आम्हाला सर्वाना आत्महत्तेची परवानगी देण्यात यावी, कारण आम्हाला आता हा त्रास आणि छळ सहान होत नाही, आमच्या सर्व मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहेत आशा देखील विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

धक्कादायक म्हणजे आंदोलना दरम्यान एका विद्यार्थ्याने डॉ भास्कर मोरेंच्या जाचास कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा देखिल दिला आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू जो पर्यंत येत नाही तो पर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. रात्री उशिरापर्यंत सदरचे आंदोलन तब्बल सहा तास सुरु होते.

यानंतर तहसीलदार गणेश माळी सदर प्रकरणी संबंधित संस्थेच्या अध्यक्ष यांना बोलावून चौकशी करण्यात येईल तसेच विद्यार्थी यांच्या मागणीनुसार विद्यापीठाच्या कुलगुरू यांना निवेदन पाठवले जाईल असे अश्वासन विद्यार्थ्यांना दिले. डॉ भास्कर मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला जाईल असे संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी सांगितले.

मनसेच्या वतीने विद्यार्थींनी निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी सांगितले की जर प्रशासकीय पातळीवर काही कारवाई झाली नाही तर मोरे यांच्या कॉलेजसमोर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टाफरे, हवा सरनोबत, सनी सदाफुले अनिल पाटील, सागर घुमरे, अशोक पोटफोडे, जगन्नाथ म्हेञे यांनी दिला आहे.

आंदोलना दरम्यान प्रा. मधुकर राळेभात ,सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले, अवदुत पवार, केदार रसाळ, काकासाहेब कोल्हे, यांनी भेट देत विद्यार्थींच्या भावना जाणून घेतल्या तसेच या बाबत जामखेड पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली. तब्बल सहा तास चालले आंदोलन हे रात्री साडेदहा वाजता मागे घेण्यात आले.

चौकट

विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून ६० तर राज्य सरकारकडून ४० टक्के शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळत असते. यापूर्वी ही रक्कम सरकार संस्थेच्या खात्यात जमा करीत असे. आता केंद्र सरकार त्यांचा ६० टक्के हिस्सा विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करते. विद्यार्थ्यांनी त्यांना अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरित रक्कम महाविद्यालयास पुढील सात दिवसांच्या आत जमा करावी असे परिपत्रक आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी दहा दिवस
उलटले तरी त्यांनी फी जमा केली नाही. त्यामुळे परीक्षा फॉर्म घेतले नाहीत. यातूनच ते वेगळा विषय मांडून आंदोलन करत आहेत.

-डॉ भास्कर मोरे अध्यक्ष रत्नदीप मेडिकल फाउंडेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here