Thursday, February 12, 2026
Home प्रादेशिक बातम्या जामखेडमध्ये पहिल्यांदा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव जागतिक महिला...

जामखेडमध्ये पहिल्यांदा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव जागतिक महिला दिनानिमित्त जनसेवा फाउंडेशन तर्फे जामखेड करांसाठी खास कार्यक्रम

0
864

जामखेड न्युज——

जामखेडमध्ये पहिल्यांदा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव

जागतिक महिला दिनानिमित्त जनसेवा फाउंडेशन तर्फे जामखेड करांसाठी खास कार्यक्रम

 

जागतिक महिला दिनानिमित्त जनसेवा फाउंडेशन तर्फे जामखेडमध्ये पहिल्यांदा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव 2024 या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सांस्कृतिक महोत्सव 2024 या कार्यक्रमात भव्य लकी ड्राँ, पैठणी आणि बरंच काही आहे. या कार्यक्रमाचे खास आकर्षण प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले, प्रसिद्ध अभिनेत्री अप्सरा हिरकणी फेम सोनाली कुलकर्णी, महाराष्ट्राचे हास्यावीर सुनील पाल रोहित माने, रसिका वेंगुर्लेकर यांच्या सह अनेक मान्यवर कलाकार उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाची संकल्पना राजू आणि प्रशांत अनासपुरे यांची आहे. रविवारी 3 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6.00 वा. जामखेड महाविद्यालय जामखेड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी खळखळून हसण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर लकी ड्राँ महिलांसाठी असून लकी ड्राँ वेळी वेळी कार्यक्रम स्थळी महिलांनी उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच आपल्याकडील कुपन बाँक्स मध्ये कार्यक्रमापुर्वी टाकण्यात यावे.

भव्य लकी ड्राँ मध्ये मोठ्या प्रमाणावर बक्षीसे आहेत. फ्रीज, वाँशिंग मशीन 32 इंच टी व्ही, वाटर प्युरीफायर, हारकुलस सायकल, मायक्रोओहन, 24 इंच टीही, 4 बर्नर ग्लास टॉप शेगडी, एअर कुलर, होम थिएटर, व्हॅक्युम क्लिनर, ट्रॅव्हल बँग, इडली कुकर, मिक्सर, इलेक्ट्रीक शेगडी, सँडविच मेकर या सह अनेक बक्षिसे ठेवण्यात आले आहेत.


चौकट
जामखेड करांसाठी खास सांस्कृतिक मेजवानी डॉ. सुजय विखे पाटील खासदार नगर यांनी आयोजित केली आहे. सर्व बक्षिसे त्यांनी ठेवलेली आहेत. तरी सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!