विहिर मंजुरी साठी लाच घेताना प्राध्यापक व ग्रामसेवक रंगेहाथ पकडले जामखेड तालुक्यात एकच खळबळ

0
5258

जामखेड न्युज——

विहिर मंजुरी साठी लाच घेताना प्राध्यापक व ग्रामसेवक रंगेहाथ पकडले

जामखेड तालुक्यात एकच खळबळ

 

जामखेड तालुक्यातील पिंपळगाव वाघा येथे
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक जलसिंचन विहीर खोदण्याकरिता प्रस्ताव तक्रारदार यांनी तयार करून ग्रामपंचायत वाघा येथे सादर केला होता. सदर विहीर खोदण्याचा प्रस्ताव मंजूर करून पंचायत समिती जामखेड येथे पाठवण्या करिता ग्रामसेवक भाबड व प्रा. बारस्कर हे आज लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडून दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वाघा येथे विहीर खोदण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो पंचायत समिती जामखेड येथे पाठवण्या करिता तक्रारदार यांच्याकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक नेताजी शिवाजी भाभड व सरपंच पती प्राध्यापक शामराव मानिकराव बारस्कर या दोघांना अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले यामुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

३६ वर्षीय तक्रारदार यांची पत्नीचे नावे मौजे वाघा येथे गट नंबर 114 मध्ये सुमारे दोन हेक्टर क्षेत्र असून सदर क्षेत्रावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक जलसिंचन विहीर खोदण्याकरिता प्रस्ताव तक्रारदार यांनी तयार करून ग्रामपंचायत वाघा येथे सादर केला होता. सदर विहीर खोदण्याचा प्रस्ताव मंजूर करून पंचायत समिती जामखेड येथे पाठवण्याकरिता ग्रामसेवक भाबड व खाजगी इसम बारस्कर हे लाच मागणी करत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर कडे दिनांक 22/02/2024 रोजी प्राप्त झाली होती. त्यानुसार दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली, पडताळणी दरम्यान भाबड व आरोपी खाजगी इसम बारस्कर या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 15000/₹ मागणी करून सदरची लाच रक्कम आरोपी भाबड यांनी खाजगी इसम बारस्कर यांच्याकडे देण्यास सांगितली असता आज दिनांक 28/022024 रोजी सापळा कारवाई दरम्यान खाजगी इसम बारस्कर यांनी पंचासमक्ष लाच स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. आरोपी भाबड व खाजगी इसम बारस्कर यांचे विरुद्ध जामखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


लाचलुचपत प्रतिबंधक अहमदनगर यांच्या पथकाने

1)नेताजी शिवाजी भाबड,वय-50 वर्षे,ग्रामसेवक,वाघा ग्रामपंचायत,जामखेड, ता.जामखेड,जि.अ.नगर,ह.रा.भोरे मिस्त्री यांची रुम,तपनेश्वर रोड,जामखेड, रा.न्याती इबोनि-4, फ्लॅट नं.41, उंडरी गाव,पुणे.

2) शामराव माणिकराव बारस्कर,वय-53 वर्षे,धंदा-नोकरी,प्राध्यापक-जामखेड महाविद्यालय,जामखेड,रा.वाघा,पो.नान्नज,ता.जामखेड,जि.अहमदनगर,ह.मु.कार्ले यांचे फ्लॅट मध्ये भाड्याने,शिवनेरी अँकडमी जवळ,विकास नगर,बीड रोड,जामखेड,जि.अहमदनगर यांना पंधरा हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले


लाचलुचपत प्रतिबंधक अहमदनगर सापळा व तपास अधिकारी राजू आल्हाट,
पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. अहमदनगर.

सहाय्यक सापळा अधिकारी
शरद गोर्डे,पोलिस निरीक्षक,ला..प्र. वि. अहमदनगर
सापळा पर्यवेक्षण अधिकारी प्रवीण लोखंडे, पोलीस उपअधीक्षक, ला प्र. विं, अहमदनगर,
सापळा पथक
मपोना राधा खेमनर, पोलिस अंमलदार बाबासाहेब कराड , गजानन गायकवाड चापोहेकॉ हारून शेख, दशरथ लाड


मार्गदर्शक-1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

2)मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक

3) श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक


चौकट
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो,अहमदनगर.
@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677
@ टोल फ्रि क्रं. 1064

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here