जामखेड न्युज——
शाळेच्या संरक्षक भिंतीसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात
ॲड डॉ अरुण जाधव यांनी दिला भीक मागो आंदोलनाचा इशारा
ॲड डॉ अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतात त्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागत अनेकांना न्याय मिळाला आहे. आता तपनेश्वर भागातील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत बाहेरील वातावरणाचा अडथळा निर्माण होतो हे लक्षात येताच डॉ जाधव यांनी भीक मागो आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
अनेकदा पाठपुरावा करुनही शासकीय अधिकारी व राजकीय नेते या शाळेकडे दुर्लक्ष करीत आहेत. लवकरात- लवकर संरक्षक भिंतीचे काम करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी दोन्ही आमदार रोहित पवार, आमदार प्रा राम शिंदे, खासदार डॉ सुजय विखे , तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी, पोलीस स्टेशन, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी, पालकमंत्री, जिल्हाधिकारी राज्यपाल व मुख्यमंत्री , शिक्षणमंत्र्यांच्या दारात जाऊन या शाळेच्या संरक्षण भिंतसाठी रस्त्यावर उतरून भिक मांगो आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे भटके विमुक्त राज्यसमन्वयक ॲड डॉ अरुण जाधव यांनी दिला.
जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथील जि.प.प्राथ.शाळा.तपनेश्वर , येथील शाळेत भटके विमुक्त आदिवासी , गरीब, कष्टकरी, शेतकरी उसतोड कामगार, दलित समाजातील लोकांची मुले या शाळेत शिकत आहे. या संरक्षण भिंतसाठी आज रोजी तहसीलदार गणेश माळी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी
अँड.डॉ.अरुण (आबा) जाधव (वंचित बहुजन आघाडी भटके विमुक्त महाराष्ट्र रा.समन्वयक), आतिश पारवे (वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुका अध्यक्ष ), ॲड ऋषिकेश डूचे,ऋषिकेश गायकवाड, राजू शिंदे, सुरज तायडे, सुर्यकांत सदाफुले, अनिल जावळे, कल्याण क्षिरसागर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ही संरक्षक भिंत पश्चिम बाजू कडील अंदाजे 30 मीटर लांबीची भिंत व प्रवेश करण्याचे गेट अंदाजे लांबी 8 मीटर पूर्ण पडले आहे. सदर संरक्षण भिंत ची बाजू पूर्ण उघडी पडल्याने जनावरे, वाहने आवारात प्रवेश करतात, त्यामुळे विद्यार्थी सुरक्षित राहत नाहीत.
वृक्ष टिकत नाहीत, स्वच्छता शालेय परिसरात राहत नाही. विविध जनावरे शाळेमध्ये घुसतात त्याचबरोबर वाहनाची भिती आहे तसेच शाळेशेजारी स्मशानभूमी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भिती निर्माण होते.
तसेच लोक कचरा आणून टाकतात, धुम्रपान करतात त्यामुळे मुला – मुलीवर चुकीचा परिणाम होत आहे. तसेच त्या गरीब वंचित समाजातील मुलांची पिडी बरबाद होत आहे. सहानभूती पूर्वक विचार करावा व निधी उपलब्ध करून द्यावा.