जामखेड न्युज——
स्पर्धा परीक्षा देताना सकारात्मक विचार करा – गोकुळ गंधे
गंधे सरांची स्पर्धा परीक्षेतून शिक्षण विस्तार अधिकारी पदी निवड
खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा येथील माध्यमिक शिक्षक गोकुळ गंधे यांची यवतमाळ येथे स्पर्धा परीक्षेतून शिक्षण विस्तार अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी बोलताना गोकुळ गंधे म्हणाले की, जिद्द चिकाटी व मेहनत महत्त्वाची आहे. स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना आपण सतत सकारात्मक विचार करावा.
अभ्यासात सातत्य आवश्यक असते. आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. सतत कार्यमग्न राहिले पाहिजे असे गंधे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
गोकुळ गंधे हे मूळचे नांदेड (माहूर) चे असून रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा हायस्कूल खर्डा येथे सहशिक्षक म्हणून काम करत आहेत. जिल्हा परिषद यवतमाळ येथे शिक्षण विस्तार अधिकारी झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गोकुळ गंधे सरांचा सन्मान जामखेड येथील स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने करण्यात आला.