पुण्यात शिक्षणाच्या नावाखाली अनेक मुली नशेच्या विळख्यात, शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर होत आहे नक्षेचे माहेरघर

0
1593

जामखेड न्युज——

पुण्यात शिक्षणाच्या नावाखाली अनेक मुली नशेच्या विळख्यात, शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर होत आहे नक्षेचे माहेरघर

 

पुणे शहर गेल्या काही दिवसांपासून एका गंभीर प्रकरणासाठी चर्चेत आलं आहे. शहरात ११०० कोटी रुपयांचं ६०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. यानंतर आज संध्याकाळी पुण्यातील वेताळ टेकडीवर दोन कॉलेज तरुणींनी ड्रग्जचं सेवन केल्यानं ऑऊट ऑफ कन्ट्रोल झाल्याचं पहायला मिळालं आहे. याचा व्हिडिओ सुज्ञ नागरिकाने व्हायरल केला आहे.

अभिनेता-दिग्दर्शक रमेश परदेशी यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे. यामुळं पुण्याची तरुणाई भरकटत चालल्याचं हे प्रातिनिधीक उदाहरण समोर आल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.


रमेश परदेशी यांनी या प्रकरणावर बोलताना सांगितलं की, वेताळ टेकडीवर आम्ही पळायला आलो होतो. तर इथं महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या या दोन तरुणी बियर, दारु आणि नशेचं काहीतरी घेऊन टेकडीच्या कोपऱ्यात पडल्या होत्या. या तरुणींना आम्ही इथं सेफ जागी घेऊन आलो. हे यासाठी सांगतोय कारण पुण्यात दोन दिवसांपूर्वी ४ हजार कोटींचं ड्रग्ज सापडलं आहे.


शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर असलेलं पुणे शहर हे आता नशेचं माहेरघरं होतंय का? याचा आपण सर्वांनी गंभीरपणे विचार करायला हवा.

पुण्यातील टेकड्यांवर लोक आपलं शरीर सांभाळण्यासाठी येतात तिथं ही तरुण मुलं मुली अशा प्रकारे नशा करतात. आपल्या आई-वडिलांना माहिती नसतं की मुलं नक्की काय करतात बाहेर.


त्यामुळं आपण एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहिण म्हणून आपण याकडं गांभीर्यानं बघणार आहोत की नाही. पुण्यात ४ हजार कोटी ड्रग्ज सापडलं पण पुणेकरांनी यावर साधी एक प्रतिक्रिया दिलेली नाही.

मागे ललीत पाटील सापडला आणि आता हे. त्याचा केवळ राजकारणासाठीच वापर झाला. पण यामुळं तरुण पिढी बरबाद होत आहे याचा आपण गांभीर्यानं विचार करणार आहोत का नाही? जर आत्ताच काही केलं नाहीतर पुण्याचा उडता पंजाब व्हायला वेळ लागणार नाही, अशी खंतही यावेळी रमेश परदेशी यांनी म्हटलं आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here