जामखेड न्युज ——-
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे -शिक्षक नेते किसन वराट
महाराष्ट्र राज्य प्राथ शिक्षक संघाचा महामेळावा व त्रैवार्षिक अधिवेशन अहमदनगर येथे येत्या २४ फेब्रुवारी रोजी पार पडत आहे सदर मेळाव्यात शिक्षकाचे जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न मंत्री महोदयाच्या उपस्थितीत सोडवले जाणार असुन त्यासाठी सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जामखेड शाखेची नुकतीच बैठक पार पडली या बैठकीत जामखेड तालुक्यातून शिक्षकांनी बहुसंख्येने हजर राहण्याचे आवाहन शिक्षक नेते किसन वराट, राम निकम, उत्तम पवार, प्राथ शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष नानासाहेब मोरे, तसेच यादव दत्तात्रय, लहाने नारायण, निंबाळकर हनुमंत, राजेंद्र मोहळकर, घोडेस्वार अशोक, घोडेस्वार अभिमान, चव्हाण गणेश, तांबे दिपक, प्रविण पवार, विकास हजारे, साखरे रजनीकांत, चंद्रकात पांडुळे, रेणुके विजय, कुमार दळवी, बुडगे सर, सवाई सर, रोडे सर आदी शिक्षक बांधवांनी केले आहे.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ महामेळावा, राज्याचे त्रैवार्षिक अधिवेशन, राज्याची महामंडळ सभा शनिवार दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी दोन वाजता द्वारका लाँन कल्याण रोड अहमदनगर येथे संपन्न होत आहे.
या महामेळाव्यासाठी महसुल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात सातत्याने सकारात्मक असणारे आमदार सत्यजित तांबे, शिक्षकांचे पंचप्राण सर्वोच्च नेते संभाजीराव थोरात, सह सर्व पदाधिकारी तसेच राज्याचे प्रश्न सोडवणारे रावसाहेब रोहकले, राष्ट्रीय सरचिटणीस बाबासाहेब झावरे अलौकिक बुद्धिमत्ता व प्रतिभा लाभलेले डॉ. संजय कळमकर, राज्याचे सरचिटणीस आबासाहेब जगताप, रावसाहेब सुंभे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महामेळावा संपन्न होत आहे.
मेळाव्यातील प्रमुख मागण्या
१) शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट्ट रद्द करावी,
२) संगणक परीक्षा अपात्र शिक्षकांची वसुली त्वरित थांबवावी
३) २००५ नंतरच्या शिक्षकांना सरसकट जुन्या पेंशन योजनेचा लाभ घ्यावा
४) शिक्षकांची अवांतर कामे त्वरित काढून घ्यावीत
यासह इतर मागण्या मार्गी लावण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राथमिक शिक्षक संघ जामखेडच्या वतीने करण्यात आले आहे.