शिवजयंती महोत्सवानिमित्त जामखेड मधील राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेत नगरची राजसी भणगे प्रथम

0
234

जामखेड न्युज——

शिवजयंती महोत्सवानिमित्त जामखेड मधील राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेत नगरची राजसी भणगे प्रथम

 

जामखेड तालुका सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेत नगर येथील राजसी प्रसाद भणगे हीने प्रथम क्रमांक तर द्वितीय कलिका जावळे, नगर तर तृतीय क्रमांक अनुष्का तंटक, शिरुर घोडनदी यांनी पटकावला आहे.

जामखेड येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सवा निमित्त दि.१२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्मीय व सर्व पक्षीय तालुकास्तरीय आशा भव्य दिव्य सार्वजनिक जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. काल नुकत्याच राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा संपन्न झालेल्या होत्या.


याच अनुषंगाने रविवार दि १८ फेब्रुवारी रोजी सकाळी शहरातील लोकमान्य वाचनालय येथे राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धा जामखेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत ३२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

यावेळी प्रा. मधुकर राळेभात अवधुत पवार, शहाजी राळेभात, डॉक्टर प्रशांत गायकवाड, डॉ.भरत देवकर, प्रशांत राळेभात, दत्तात्रय सोले, पाटील, तात्याराम बांदल, महेश यादव, संभाजी राळेभात, संतोष सरसमकर सर, कुंडल राळेभात, अमित जाधव, आशोक शिंदे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात म्हणाले की अभिनया मधिल ही स्पर्धा अतिशय आगळी वेगळी स्पर्धा आहे. या नाट्यछटा स्पर्धेमुळे बाहेरगावच्या स्पर्धेकांन बरोबरच जामखेड येथील कलाकारांना अभिनयाची संधी मिळाली आहे. त्यामुळे नक्कीच या मधिल एखादा कलाकार भविष्यात महानायक कलाकार झाल्या शिवाय रहाणार नाही.

राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेत प्रथम क्रमांक राजसी प्रसाद भणगे, (अहमदनगर), द्वितीय क्रमांक कलिका नितीन जावळे, अहमदनगर, तृतीय क्रमांक, ज्ञानेश्वरी निवृत्ती लोहार (पुणे आळंदी), चतुर्थ क्रमांक अनुष्का संजय तंटक (शिरुर घोडनदी), उत्तेजनार्थ क्रमांक श्रेया अशोक शिंदे, जामखेड व सादीया ताजोद्दीन शेख जामखेड यांनी पटकावला आहे. स्पर्धेचे परीक्षक म्हणून नगर येथील देवीप्रसाद सोहनी यांनी काम पाहिले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अविनाश बोधले, दिपक तुपेरे, संतोष सरसमकर, रजनीकांत साखरे, जितेंद्र आढाव, यांनी खास परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सरसमकर सर यांनी केले तर आभार अवदुत पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here