जामखेड न्युज——
जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत सम्राट घोडेस्वारचे घवघवीत यश
जामखेड तालुक्यातील अवघड क्षेत्रातील बोराटे मोहिते वस्ती शाळेतील विद्यार्थी सम्राट शिल्पा अशोक घोडेस्वार याने अहमदनगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे याबद्दल त्याचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
शहरातील रेसिडेन्सी हायस्कूल या ठिकाणी ही स्पर्धा झाली होती. यात सम्राट घोडेस्वारने द्वितीय क्रमांक पटकावला सम्राट च्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, पिंपळगाव आळवा गावचे सरपंच सौ. शोभाताई मोहिते व बाबासाहेब मोहिते तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ.अश्विनी मोहिते व शांतीलाल मोहिते, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री सावता बोराटे श्री जालिंदर मोहिते साहेब, दक्ष ओ.इ.एस आणि काँसिलिंग चे संचालक श्री दशरथ बिरंगळ सर तसेच राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश मोहिते, यांनी कौतुक केले.तसेच शाळेतील शिक्षक श्री मनोज दळवी सर श्री अशोक घोडेस्वार सर श्री सचिन जोरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
संगणकाच्या काळात सुंदर हस्ताक्षराकडे होत असलेले विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष बघता सम्राट घोडेस्वारने आपल्या सुंदर हस्ताक्षराने सर्वानाच भुरळ घातली आहे. आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
माणसाचे व्यक्तिमत्व आणि हस्ताक्षर यांच्यात जवळचा संबंध आहे. यांचे हस्ताक्षर सुंदर असते. त्यांचे व्यक्तिमत्त्वही तसेच सुंदर बनते. व्यक्तिमत्व घडवण्यात हस्ताक्षराचा मोठा वाटा असतो. त्यामुळे परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असतो. योग्य मार्गदर्शन व सरावातून सहजपणे सुंदर हस्ताक्षर काढण्याची कला अवगत करता येऊ शकते.
सम्राट घोडेस्वार साठी शाळेतील शिक्षक मनोज दळवी, अशोक घोडेस्वार, सचिन जोरे यांचे मार्गदर्शन लाभले.