जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून कर्जत-जामखेडची आरोग्य यंत्रणा सध्या कात टाकत असुन आता नव्याने आरोग्य यंत्रणेत सक्षमीकरण होत आहे.उपजिल्हा रुग्णालय कर्जत व ग्रामीण रुग्णालय जामखेड तसेच मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी त्यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध झाला आहे.कोरोनाचे थैमान सुरू असतानाच अत्याधुनिक वैद्यकीय सामग्रीच्या माध्यमातून मिळालेली मदत रुग्णांना नवजीवन प्रदान करणारी ठरली आहे.
रुग्णांचे तापमान, मधुमेहाचे प्रमाण, ऑक्सिजन पातळी आदी प्राथमिक चाचण्यांचे निदान तात्काळ होत असल्याने त्यांच्यावर योग्य उपचार होत आहेत.गंभीर स्वरूपाच्या आजाराचे निदान झाल्यास रुग्णांना कमी वेळेत उपचार घेण्यासाठी आ.रोहित पवार यांच्या प्रयत्नातून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या रुग्णवाहिका वरदान ठरत आहेत.दि.३० रोजी जामखेडसाठी पुन्हा एक रुग्णवाहिका दाखल झाली आहे.गोरगरीब नागरिकांना खाजगी रुग्णालयात जाऊन विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांवर उपचार घेणे शक्य नसल्याने आ. रोहित पवारांनी अद्ययावत शस्त्रक्रिया गृह मंजूर करून आणले आहे आणि त्याचे कामही प्रगतीपथावर आहे.
यामुळे शासकीय रुग्णालयाचे पहिल्यांदाच असे बळकटीकरण झाले आहे.शहरी भागात हा बदल झाला असला तरी ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी मतदारसंघातील आरोग्य केंद्रांनाही मर्यादेपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे.
भौतिक विकासाबरोबरच यात काम करणाऱ्या व्यवस्थापनावर लक्ष ठेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना ताकद देण्याचे काम करण्यात आले त्यामुळेच मोठ्या हिमतीने सर्वच आरोग्य अधिकारी कर्मचारी नागरिकांच्या सेवेत जीव ओतून काम करत आहेत.तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन कोणत्याही रुग्णाची उपचाराअभावी हेळसांड होऊ नये तसेच लहान मुलांना होणारा अधिकचा धोका लक्षात घेऊन कर्जत उपजिल्हा रुग्णालयात तर मुलांसाठी नैसर्गिक कलाकृतींना सजावट केलेले आगळेवेगळे कोव्हिड सेंटर साकार करण्यात आले आहे.कर्जत उपजिल्हा आणि जामखेड ग्रामीण रुग्णालयांसोबतच ग्रामीण भागात असणाऱ्या आरोग्य केंद्रांना वैद्यकीय उपकरणांबरोबरच रुग्णवाहिकांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याने ही यंत्रणा अधिक गतिमान झाली आहे.
कोरोना काळात कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या आरोग्याची काळजी घेत असताना आ.पवारांनी कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा न करता राज्याच्या मदतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.राज्याच्या विविध भागात सॅनिटायझर,ऑक्सिजन कोन्स्टंट्रेटर,मास्क,चष्मे, हँडग्लोज आदींचे स्वखर्चाने वाटप करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.