जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि वनविभाग जामखेड च्या संयुक्त विद्यमानाने मोहा घाटामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले मी गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून वृक्षारोपण प्रत्येक शाळेमध्ये, डोंगर दरीमध्ये करत असतो कोणत्याही कार्यक्रमात वृक्ष देऊन सन्मान करत असतो दरवर्षी आम्ही वृक्षारोपण १ जुलै ते ३१ जुलै पर्यंत वृक्षारोपण करत असतो यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्रफुल्ल सोळंकी, गौरव अरोरा ,अनिल फिरोदिया, वन अधिकारी किसन पवार, शहाजी डोंगरे , भोगल जय हरी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वनाधिकारी किसन पवार म्हणाले सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे दरवर्षी आमच्याबरोबर वृक्षारोपण करत असतात सामाजिक क्षेत्रात त्यांचं काम उल्लेखनीय आहे आज आमच्या वन मजुरांना त्यांनी नाश्ता घेऊन आले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो.