मानवी तस्करीमध्ये अडकलेल्या पिडीतांच्या पुनर्वसनात न्यायिक अधिकारी व सरकारी वकीलांची भूमिका महत्त्वाची – जिल्हा व सत्र न्यायाधीश आणेकर

0
243
जामखेड न्युज – – – – 
मानवी तस्करीमध्ये अडकलेल्या सर्व पिडीतांच्या पुनर्वसनाकामी न्यायिक अधिकारी तसेच सरकारी वकीलांची महत्वाची भूमिका असते असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत आणेकर यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नगर, नगर बार असोशिएशन आणि सेंट्रल बार असोशिएशन नगर यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक औषधे दुरुपयोग व अवैध तस्करी विरोधी दिन साजरे करणेकरीता तसेच मानवी तस्करी आणि पिडीतांचे पुर्नवसन या विषयावर कायदेविषयक जागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे, सेंट्रल बार असोशिएशन अध्यक्ष  सुभाष काकडे, अहमदनगर बार असोशिएशन अध्यक्ष भुषण ब-हाटे, जिल्हा सरकारी वकील सतिश पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  आणेकर म्हणाले की, कायद्यामधील तरतुदीनुसार न्यायदानासोबतच पिडीतांचे पुर्नवसन करता येते. यामध्ये सरकारी वकीलांची महत्वाची भूमिका असते आणि ते पुनर्वसन कामी इतर शासकीय कार्यालयाशी समन्वय साधुन न्यायालयाला बर्‍याच गोष्टी  सुचवू शकतात. तसेच अनैतिक प्रतिबंध कायदा हा फक्त महिलांसाठी नसुन महिला व पुरुष दोन्हींसाठी आहे तसेच त्या कायद्याची योग्य अंमलबजावणी होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी केले. अत्याचारग्रस्त आणि अन्याय झालेले लोकांना न्याय मिळवुन देणेत सरकारी वकीलांची महत्वाची भूमिका असते. महिलांवरील अत्याचार हा गंभीर विषय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीस श्री. आणेकर यांनी संवेदनशील पध्दतीने हाताळुन अनेक अत्याचारग्रस्त महिलांना मनोर्धर्य योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
सेंट्रल बार असोशिएशन अध्यक्ष अॅड. काकडे यांनी पिडीतांचे पुर्नवसनाकरीता शासकीय योजना या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांना पुर्नवसन करीता संवेदनशील मनाची गरज असते, असे ते म्हणाले. तसेच नगर बार असोशिएशन अध्यक्ष अॅड. ब-हाटे यांनी जागतिक औषधी अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरोधी दिन 26 जून रोजी का साजरा केला जातो याबाबत सांगितले.
अहमदनगर मुख्यालयात कार्यरत असलेले सरकारी वकील प्रत्यक्ष तर दूरदूश्यप्रणालीद्वारे स्नेहालय संस्था,  माऊली सेवा प्रतिष्ठाण येशील महिला तसेच जिल्हयात कार्यरत असलेल्या सरकारी वकीलांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पॅनल विधीज्ञ मनिषा केळगंद्रे यांनी केले तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कनिष्ठ लिपीक भारती पाठक यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here