जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
ग्रामपंचायतींना केंद्राकडून वित्त आयोगाच्या माध्यमातून
येणारा निधी शाश्वत विकास कामांसाठीच खर्च करण्याचे
स्वातंत्र्य मिळावे. १५ व्या वित्त आयोगातील निधी केवळ विकास व पायाभूत सुविधावर खर्च करण्यात यावा अशी मागणी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली १४ सदस्यीय शिष्टमंडळाद्वारे महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी काकडे म्हणाले की, ग्रामपंचायत ही स्वायत्त स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामपंचायतीच्या निर्णयानुसार केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांच्याकडून आलेला निधी गावच्या मागणी,गरजेनुसार आणि ग्रामसभेतील निर्णयानुसार खर्च होणे अपेक्षीत आहे मात्र ग्रामपंचायतींना
येणाऱ्या १५ व्या. वित्त आयोगातील निधीला राज्य सरकारने वेगवेगळी परिपत्रके काढून तो निधी शाश्वत कामापेक्षा कॉम्प्युटर ऑपरेटर मानधन,लाईट बील,
हातपंप दुरुस्ती कर सल्लागार एजन्सी या सह अन्य बाबीवर खर्च करण्याचे आदेश काढल्याने या निधीतून गावचा विकास होत नाही,त्यामुळे केंद्राने दिलेल्या निर्देशानुसारच हा निधी खर्च करण्यात यावा.
१५ व्या वित्त आयोगातील निधीतून गावाचा विकास होण्यासाठी उपलब्ध निधी केवळ विकास व पायाभूत सुविधा यांवर खर्च करण्यात यावा, मुंबई येथे सरपंच भवनाची निर्मिती करण्यात यावी. करोनामुळे निधन झालेल्या राज्यातील ३५ सरपंचांच्या कुटुबिंयाना आर्थिक मदत मिळावी अशा १२ मागण्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी सरपंच परिषद मुंबईचे प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव, विश्वस्त अविनाश आव्हाड, राजाराम पोतनिस, आनंद जाधव किसन जाधव अविनाश आव्हाड,
अश्विनीताई थोरात,आरुणभाऊ कापसे, संजय जगदाळे, शत्रुघ्न धनवडे, विठाबाई वनवे, वनिताताई सुरवसे, अनिकेत घाडगे, अंजलीताई ढेपे, मनीषाताई यादव यांच्यासह सरपंच उपस्थित होते.