जामखेड न्युज——
अधिकारी घरी कार्यालय वाऱ्यावरी
जामखेड महावितरणमध्ये सावळागोंधळ
घरगुती वापराचे चक्क पन्नास हजार रुपये बील वारंवार महावितरण कार्यालयात चक्करा मारल्या पण अधिकारी भेटत नाहीत. मिटिंगला आहेत रजेवर आहेत. आठवड्यातून एखाद्या दिवशी कधी येतात आणि कधी नाही हे ग्राहकांना कळतच नाही सध्या महावितरण कार्यालयात अधिकारी नसतातच अधिकारी घरी व कार्यालय वाऱ्यावरी अशी अवस्था जामखेड महावितरण कार्यालयात झाली आहे. जामखेड साठी दोन आमदार असतानाही ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
जामखेड महावितरण कार्यालयात सध्या मोठ्या प्रमाणावर सावळागोंधळ सुरू आहे. अधिकारी कार्यालयात वेळेवर उपस्थित नसणे, फोन न घेणे, बील दुरूस्ती अर्ज करूनही बील दुरूस्ती न करणे, अव्वाच्या सव्वा बीज बील आकारणी, नादुरूस्त मीटरसाठी दीड ते दोन हजार रुपये ग्राहकाकडून उकळणे, वारंवार बत्ती गुल होणे असे प्रकार जामखेड शहरात सर्रास सुरू आहे. यामुळे ग्राहकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
जामखेड शहरासह तालुक्यात जादा बील आले, मीटर नादुरुस्त आहे अशा मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. यासाठी ग्राहकांना वारंवार महावितरण कार्यालयात चकरा माराव्या लागतात पण अधिकारी भेटतच नाहीत. रजेवर आहेत, दुपारी येतील असे सांगितले जाते अधिकारी फोनही उचलत नाहीत. ग्राहक चकरा मारून हैराण होतात.
एका ग्राहकांने सांगितले की, माझ्या घरात दोन माणसे आहेत दोन खोल्या आहेत घरातील मीटर दोन वर्षांपासून बंद आहे. सरासरीने वाढीव बील दिले जाते. याबाबत दोन वर्षांपूर्वी महावितरण कडे मीटर बदलीसाठी अर्ज केला आहे पण अधिकारी म्हणतात मीटर नाहीत. खाजगी दुकानातून मीटर घ्यावे लागेल आमचा वायरमन तुम्हाला मीटर आणुन बसवून देईल तुम्ही दोन हजार रुपये द्या असे सर्रास सांगितले जाते.
महावितरण मधील एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, खाजगी व्यक्ती किंवा दुकान नाही तर महावितरण मधीलच मीटर तुम्हाला दीड ते दोन हजार रुपयांना विकले जाते. जे पैसे देतील त्यांना मीटर बदलून दिले जाते.
ग्राहक आपल्या समस्या घेऊन महावितरणच्या कार्यालयात गेल्यास, अधिकारी ग्राहकांना पटेल असे स्पष्टीकरण देत नसल्याने ग्राहक संतापतात त्यातुनही ग्राहकास बिलाची रक्कम कमी करुन मिळाली तरी, तो आनंद पुढीूल बिलात ग्राहकाकडुन हिरावुन घेतला जातो अशी तक्रार अनेक ग्राहकांची आहे. तर दुसरीकडे वारंवार मीटरची मागणी करुणही मीटर वेळेत मिळतच नाहीत. एखाद्या ग्राहकांना वाद घालण्याचा प्रयत्न केल्यास, मीटर रीडिंग व बिलवाटपाचे काम खाजगी एजन्सींना दिले असल्याचे सांगून अधिकाऱ्यांच्याकडुन जबाबदारी झटकली जाते.
चौकट
जादा बील दुरूस्ती साठी झेरॉक्स मधुन फार्म घेऊन बीलाची झेरॉक्स जोडून आपल्या विभागातील वायरमनला मीटर दाखवल्या नंतर तो लोड चेक करून सही करतो नंतर कनिष्ठ अभियंता यांच्या कडे द्या म्हणून सांगितले जाते आठवड्यातून कधीतरी येणारे अधिकारी भेटले तर सर्व चेक करून नोंद ठेवून वीज बील दुरूस्ती टेबलवर जा म्हणून सांगितले जाते ते म्हणतात आता नाही पुढील बीलात दुरूस्ती होईल हि प्रक्रिया करण्यासाठी आठ ते दहा दिवस जातात पुढील महिन्याचे बील देताना काहीही दुरूस्ती झालेली नसते. परत त्यांना भेटले तर ते म्हणतात आता सगळे बील भरा दुरूस्ती होणार नाही. यामुळे ग्राहकांना नाहक मानसिक त्रास होत आहे.