जामखेड न्युज——
परदेशी महिलांनाही भारतीय सणांची भुरळ!!!
जामखेडमध्ये परदेशी महिलांनी नऊवारी साडी परिधान करत मकरसंक्रांत या सणानिमित्त मंदिरात जाऊन पुजा अर्चा करत एकमेकींना वाण म्हणून वस्तू दिल्या यामुळे भारतीय सणांची भुरळ परदेशी महिलांनाही पडली आहे.
परदेशी महिलांनाही भारतीय सणाचे आकर्षण, मकर संक्रांती निमित्त जामखेड येथील विठ्ठल मंदिरात लुटला मकर संक्रांतीचा आनंद पुर्वीपासूनच जामखेड येथील आरोळे हाॅस्पिटल येथे विविध कामानिमित्त तसेच वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठी येत असतात.
येणाऱ्या परदेशी नागरिकांना भारतीय सण उत्सवांचे आकर्षण राहीले आहे. त्यान दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या परदेशी महिलांकडून या सणाचा आनंद घेतला जातो. त्यानुसार याही वर्षी अमेरिकेतील युलाॅन युनिव्हर्सिटी मधील परदेशी माहिला जामखेड येथील आरोळे हाॅस्पिटल येथे शिबिरासाठी आलेल्या आहेत.
या महिलांनी आज दि. १५ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या सणा निमित्त अस्सल महाराष्ट्रीयन पेहराव असलेली साडी घालून जामखेड शहरातील विठ्ठल रूक्मिणी मंदीरात हळदी कुंकू व तिळगुळ वाटप मकर संक्रांती सणाचा आनंद लुटला.
यावेळी बोलताना अमेंडा टाॅपलर म्हणाल्या की, आम्ही सर्व माहिला मकर संक्रांतीच्या सणात सहभागी झालो. तसेच या सणाचा आनंद साजरा करु शकलो. आम्हाला खुपच आनंद मिळत आहे.
मकरसंक्रांत सणात आम्ही साडी परिधान केल्याने
आम्हाला खूप आनंद झाला. तसेच जामखेड येथील माहिलांनी आमचे मोठ्या उत्साहात स्वागत करून विठ्ठल – रुक्मिणी येथे देवांचे दर्शन घडवले. याचाही खूप आनंद वाटला. यावेळी उपस्थित माहिलांनी संक्रांत सणाबद्दल बद्दल माहिती दिली. भारत देशाच्या संस्कृतीने मी प्रभावित झाले.
यावेळी मिना संसारे, उमा कोल्हे, पूजा डिसले, अमेंडा टाॅपलर, सिल्बीया मिनोज तसेच जामखेड शहरातील माहिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.