जामखेड न्युज——–
राज्यस्तरीय शिक्षा भुषण पुरस्काराने प्रा.विकी धर्मेंद्र घायतडक सन्मानित
राज्यस्तरीय गोवा, गुजरात, राजस्थान, तमिळनाडू या पाच राज्यातून निवडला जाणारा ग्लोबल स्कॉलर फाऊंडेशन पुणे आयोजित शैक्षणिक क्षेत्रात इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिक्षा भूषण पुरस्काराने जामखेड शहरातील विकी धर्मेंद्र घायतडक (प्राचार्य डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जामखेड) यांना पद्मश्री सुधाकर ओलवे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी पद्मश्री सुधारक ओलवे, संस्थेचे अध्यक्ष सुनील बेलगावे,प्रोजेक्ट डायरेक्टर ग्रिष्मा जाधव,प्रोजेक्ट मॅनेजर स्नेहा रोकडे,स्मिता जिंकले,वंजारे रविकुमार,विनोद खटके ,आदर्श तोरसकर ,अमोल सदाफुले,गौरव सदाफुले,कबीर घायतडक,शुभम सदाफुले,सुमित घायतडक आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्र संचालन निरजा आपटे,आभार प्रदर्शन उज्वला शिलिमकर मॅडम यांनी मानले.
प्राचार्य विकी घायतडक यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आमदार रोहित पवार,अभय जोशी ( उपसचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण ,मंडळ) ,दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे, सहसेक्रेटरी दिलीप गुगळे, प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, कैलास माने, शहाजी राळेभात, बिभिषण (मामा) धनवडे,
नगरसेवक अमित जाधव,हरिभाऊ आजबे, राजेंद्र पवार, युवा नेते प्रवीण बोलभट , विष्णुपंत गंभीरे ,सलिम बागवान,संतोष जगताप, संतोष ढाळे, विवेक ढवळे , किशोर हुंबे, जयसिंग पवार,प्रा.संजय राऊत, रमेश आजबे, अमोल गिरमे,सनी सदाफुले आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
विकी घायतडक यांचा आतापर्यंत झालेला सन्मान
यापूर्वी घायतडक यांना अध्यक्ष पीपल्स वेल्फेअर फाउंडेशन, समाज भूषण पुरस्कार 2022, आदर्श अभियंता पुरस्कार 2021,टीचर्स इंनोवेशन अवॉर्ड दिल्ली 2019,धम्म पुरस्कार 2012, कॉम्प्युटर इंजिअरिंगमध्ये कॉम्प्युटर सेक्युरिटी या विषयावर संशोधन सुरू आहे.असे विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.