जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये बसणार बायोमेट्रिक प्रणाली
युवक क्रांती दलाच्या मागणीला यश
गावगाडा कारभारात महत्त्वाचे घटक असलेल्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये कार्यालयीन वेळेत उपस्थितीसाठी आता बायोमेट्रिक हजेरी प्रणाली प्रत्येक ग्रामपंचायतने बसवावी असा आदेश गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी ग्रामपंचायतला काढले आहेत. युवक क्रांती दलाने नागरिकांच्या सोईसाठी मागणी केली होती. यानुसार त्यांच्या मागणीला यश मिळाले आहे. यामुळे आता नागरिकांनी सोय होणार आहे.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या पत्रकानुसार जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतला पत्रक काढून बायोमेट्रिक प्रणाली बसवण्यास सांगितले आहे.
यावेळी युवक क्रांती दलाचे राज्य संघटक आप्पा अनारसे युवक क्रांती दलाचे जामखेड तालुकाध्यक्ष विशाल नेमाने, लक्ष्मण घोलप ज्येष्ठ समाजसेवक, विजय घोलप, अजय नेमाने, बापूसाहेब घोडेश्वर, अशोक नेमाने, शरद मुरूमकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतीशी निगडित कामासाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची दरवेळी वाट बघत ताटकळत बसण्याची, त्यांना शोधण्यासाठी धावाधाव करण्याची तसेच फोनवर संपर्क साधण्याची गरज तेथील नागरिकांना आगामी काळात पडणार नाही.
ग्रामीण भागातील गावाच्या विकासाचा कणा समजले जाणारे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वेळेत उपलब्ध झाल्याने नागरिकांची गैरसोय आगामी काळात टळून गावच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बाबतचे पत्र शासनस्तरावरून येथील गटविकास अधिकारी यांना प्राप्त झाले आहे. त्यामध्ये तत्काळ कार्यवाही करून घेण्यात यावी, अहवाल शासन स्तरावर पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यानुसार गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायतला पत्रक काढले आहे.
ग्रामपंचायत कारभारात महत्त्वाचे घटक असलेल्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये कार्यालयीन वेळेत उपस्थितीसाठी आता बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला.