जामखेड न्युज——
जामखेड मध्ये शतपावली करणाऱ्यांना तळीरामांचा त्रास
पोलीसांनी बंदोबस्त करावा नागरिकांची मागणी
जामखेड शहरात तपनेश्वर विंचरणा नदीच्या कडेने चांगला सिमेंट रस्ता तसेच तसेच नागेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी चांगले रस्ते झाले आहेत. तसेच नियोजन एमआयडीसी राऊत मैदान येथे सायंकाळी व सकाळी अनेक नागरिक येथे फिरण्यासाठी येतात. पण सायंकाळी रस्त्याच्या कडेला अंधाराचा फायदा घेत तळीरामांचा धुडगूस सुरू असतो. याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. यांचा बंदोबस्त जामखेड पोलीसांनी करावा अशी मागणी होत आहे.
सायंकाळी व सकाळी अनेक नागरिक विंचरणा नदीच्या काठावर तसेच नागेश्वर मंदिराजवळ तसेच नियोजित एमआयडीसी राऊत मैदान या ठिकाणी फिरणासाठी येतात मात्र रस्त्याच्या कडेला दारूच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या तसेच कागद अस्ताव्यस्त पडलेले असतात तसेच सायंकाळी तर तळीरामांचे बोलणे, त्यांचा धिंगाणा याचा त्रास महिला, मुली व नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे.
सरत्या वर्षाला निरोप अन नवीन वर्षाचे स्वागत करताना आजचा दिवस थर्टी फर्स्ट म्हणून साजरा करण्याची पाश्चिमात्य संस्कृती आज आपल्या देशात बऱ्यापैकी रुजलेली आहे. नव वर्षाचे स्वागत आपल्या प्रिय जणांसोबत करण्यात गैर असे काहीच नाही. परंतु नव वर्षाचे स्वागत नशेच्या आहारी जाऊन शांतता बिघडविण्याचा प्रयत्न होतो.
नववर्षाचे स्वागत करताना सार्वजनिक ठिकाणी दारु पिऊन धिंगाणा घातला जात आहे. याचा बंदोबस्त पोलीसांनी करावा अशी मागणी होत आहे.
तपनेश्वर भागातील विचंरणा नदीच्या काठावर नवीन सिमेंट रोडवर रात्रीच्या वेळी तळीरामाचे राज्य असते काही जण रिक्षात येतात रिक्षा साइडला लावुन रिक्षात दारु पितात व तर काही जण चार चाकी गाडी मध्ये येतात गाडी साईडला लावून गाडी मध्ये दारू पितात तर काही जण रोडच्या बाजूला मैफिल करून बसतात व दारू पीत बसतात.
संध्याकाळी काही जण जेवणानंतर फिरत असताना त्यांना हे चित्र पाहण्यास मिळते विषेश म्हणजे आता रोडच्या साईडला लाईटचे पोल बसवले आहेत तरी पण ते बिनधास्त बसतात फिरणाऱ्या लोकांना त्यामुळे संकोच वाटतो पोलीस प्रशासनाने संध्याकाळी ७ ते ९.३० यावेळी पेट्रोलिंग करणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
जर कारवाई केली नाही तर त्यांना चांगली मोकळीक मिळेल व ते नंतर फिरणाऱ्या लोकांना त्रासदायक ठरू शकते.