जामखेड न्युज——
वाळुंज एमआयडीसीत हातमोज्याच्या कंपनीला भीषण आगीत सहा कामगारांचा मृत्यू, एकच हाहाकार
छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर २१६ मध्ये ‘सनशाइन इंटरप्राईजेस’ कंपनीत रविवारी झालेल्या अग्नितांडवात सहा कामगारांचा जळून मृत्यू झाला. बिहार राज्यातील हे कामगार आहेत. रात्रीपासून पहाटेपर्यंत आग भडकतच होती. आग लागल्यानंतर इमारतीतून लोक मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसले होते.
सहा जणांचा होरपळून मृत्यू
छत्रपती संभाजीनगमधील एमआयडीसीमध्ये हातमोजे बनविणाऱ्या कंपनीला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या कारखान्याला आग लागली असून कामगार अडकल्याचे स्थानिकांनी कळविले होते. आग लागल्यानंतर इमारतीतून लोक मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसले होते.
कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, इमारतीत सहा कर्मचारी अडकले आहेत. भुल्ला शेख (65), कौसर शेख (26), इक्बाल शेख (26) आणि मगरूफ शेख (25) अशी अडकलेल्या चार कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आग विझविण्याचे काम सुरु असल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी मोहन मुंगसे यांनी सांगितले.