जामखेड न्युज——
कांदा निर्यात बंदी उठवा अन्यथा हातात रूमणे घेणार – मंगेश आजबे
शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी सध्या मेटाकुटीला आला आहे. दुधाला भाव नाही. शेतकऱ्यांना अनुदान मिळाले पाहिजे. तसेच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घातली आहे ती उठवली नाही तर सरकार विरोधात हातात रूमणे घेणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगेश आजबे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा व रास्ता रोको आंदोलना दरम्यान दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील खर्डा चौकात भव्य असा आक्रोश मोर्चा व रास्तारोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे दोन तास आक्रोश मोर्चामुळे खर्डा चौक येथे रास्ता रोको आंदोलन सुरू होते यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी विविध शेतकऱ्यांनी सरकार विरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, मंगेश आजबे, बब्रुवान वाळुंजकर, काका चव्हाण, भीमराव पाटील, गणेश हगवणे, कृष्णा चव्हाण, नय्युम शेख, बापुराव शिंदे, गणेश कोल्हे, परकड, निलेश पवार, कांतीलाल वराट, काका कोल्हे यांच्या सह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने यावेळी नायब तहसीलदार मनोज भोसेकर, पोलीस निरीक्षक महेश पाटील, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशोक यादव
तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. ज्या त्या विभागाचे निवेदन ज्या त्या विभाग प्रमुखांना दिले तसेच महावितरणचे कोणीही उपस्थित नसल्याने रोष व्यक्त केला.
यावेळी बोलताना मंगेश आजबे म्हणाले की, शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी सध्या मेटाकुटीला आला आहे, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केली आहे. दुधाला भाव नाहीत, शेतकऱ्यांना अनुदान मिळाले पाहिजे, तसेच पंचायत समिती व कृषी विभागाचे लाभ नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांना मिळत नाहीत ते मिळाले पाहिजेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा अशी मागणी केली आहे.
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे म्हणाले की, कांदा निर्यात बंदीने शेतकऱ्यांना रडकुंडीला आणले आहे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा योजना ही फक्त सात बारा नावावर असणारांनाच मिळतो. शेत मजुरांना मिळत नाही यासाठी राज्यभरात आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
बावीचे माजी सरपंच निलेश पवार म्हणाले की,
कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागते हीच खरी शोंकाकिका आहे.
यावेळी निवेदन स्वीकारताना नायब तहसीलदार मनोज भोसेकर म्हणाले की, आंदोलना दरम्यानचे सर्व विषय आम्ही शासनास कळवू तसेच तालुका पातळीवरील विषय आम्ही मिटिंग घेऊन ताबडतोब सोडवू तसेच जामखेड तालुक्यातील चार हजार शंभर शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. सुमारे दोन कोटी 27 लाख बाकी आहे. मागणी केलेली आहे. मार्च एण्ड पर्यंत येईल असे सांगितले.
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी रास्ता रोको दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
चौकट
शेतकऱ्यांसाठी प्रत्येक अधिकाऱ्यांचे नंबर ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, पशुवैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचे फोन नंबर लावण्यात येतील.