जामखेड न्युज——
पंधरा वर्षांपासून रस्त्याअभावी पडिक जमिनीचा जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती करणार कायापालट
सुसज्ज रस्ता व भव्य कांदा, लिंबू मार्केट उभे राहणार, आमदार प्रा. राम शिंदे यांनी केली पाहणी
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने शेतकरी व व्यापारी हिताचे निर्णय घेत. सर्वसमावेशक कारभार सुरू केला आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीने पंधरा वर्षांपूर्वी पाण्याची टाकी येथे पंधरा एकर जमीन खरेदी केली होती. पण या ठिकाणी जाण्या येण्यासाठी रस्ताच नव्हता त्यामुळे काहीही करता येत नव्हते. नवनिर्वाचित संचालक मंडळाने सर्वाच्या सहकार्याने सर्वाना विश्वासात घेत जामखेड लेहनेवाडी शिव रस्ता खुला केला यामुळे आता येथे सुसज्ज रस्ता करून लवकरच येथे कांदा व लिंबू मार्केट करणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड यांनी १५ वर्षा पूर्वी घेतलेली १५ एकर जागा प्रशस्त मार्केट यार्ड करिता घेतली होती या जागेसाठी रस्त्याची सोय नसल्यामुळे जवळपास १५ वर्ष रस्त्याआभावी जागा पडीक होती.
रस्त्याची अडचण लक्षात येताच नवनिर्वाचीत सभापती पै .शरद दादा कार्ले व उपसभापती कैलास वराट व सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांनी रस्ता खुला होण्यासाठी प्रयत्न केले. जामखेड ते लेहनेवाडी शिव रस्ता खुला करणेकामी मा. तहसीलदार साहेब जामखेड यांच्या कडे पाठपुरावा करून सदर जागेच्या बाजूच्या सर्व दहा गटांची मोजणी करून रस्ता खुला करण्यात आला.
सदर बाजार समितीच्या १५ एकर जागेमध्ये कांदा मार्केट , लिंबू मार्केट तसेच वेअर हाऊस, कोल्ड स्टोरेज, सेल हॉल इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या प्रसंगी आमदार प्रा.राम शिंदे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पै. शरद दादा कार्ले, उपसभापती कैलास वराट, तहसीलदार योगेश चंद्रे, सर्कल माने, संचालक गौतम उतेकर, नंदकुमार गोरे, विष्णू भोंडवे, डॉ.गणेश जगताप डॉ. सिताराम ससाने, रवींद्र हुलगुंडे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, जि.प सदस्य सोमनाथ पाचरणे, केशव वनवे, नगरसेवक अमित चिंतामणी, अॅड. प्रवीण सानप, लहू शिदे, तलाठी चौगुले व ज्या शेतकरी बांधवांनी रस्त्यासाठी जमीन मोकळी करून दिली असे आदरणीय चंद्रकांत राळेभात, अरुण राळेभात, राजेंद्र राळेभात, अंबादास राळेभात, दिनेश जगताप, संजय खेत्रे, दादासाहेब मगर, प्रवीण राळेभात व अण्णासाहेब मगर तसेच संबंधित शेतकरी बांधव व श्री सय्यद वाहेद सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड या प्रसंगी उपस्थित होते.
तसेच आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून २.५० किमी रस्ता करण्याचे घोषित केले या मुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुढील काळामधे जामखेड तालुक्यातील शेतकर्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी व योग्य भाव मिळवून देण्यासाठी बाजारसमितीच्या माध्यमातून सर्व प्रयत्न केले जातील अशी असे आश्वासन सभापती पै. शरद कार्ले यांनी शेतकर्याना दिले.