जामखेड न्युज – –
खरीप हंगाम २०२१ यशस्वी करणेसाठी दिनांक २१ जून २०२९ ते १ जुले २०२१ या कालावधीत महत्वाच्या
मोहीमावर विशेष भर देऊन “कृषि संजीवनी मोहीम” राज्यात कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत दिनांक २८ जून २०२१ रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन कृषि विभाग व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचे संयुक्त विद्यमाने सकाळी १०.१५ वाजता कृषि मंत्री दादाजी भुसे यांचा राज्यातील फळपिके उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद आयोजीत करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमास मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. .महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत फळबाग लागवड, स्वयंचलीत खत व ठिबक सिंचन प्रकल्पाचे उदघाटन, कृषि प्रदर्शनाचे आयोजन तसेच फळबाग लागवड, उत्कृष्ट कामकाज करणारे कृषि सहाय्यक यांचा सत्कार, फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे मनोगत तसेच कृषि विभागाचे वरीष्ठ अधिकारी, कृषि शास्त्रज्ञ आणि कुलगुरु, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचे मार्गदर्शन होणार आहे.
कृषि संजीवनी मोहीम” अंतर्गत २१ जून २०२९ रोजी बीबीएफ लागवड तंत्रज्ञान ( रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान ), दिनांक २२ जून रोजी बिजप्रक्रिया, दिनांक २३ जून रोजी जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलीत वापर, दिनांक २४ जून रोजी कापूस एक गांव एक वाण आणि भात, ऊस, कडधान्य व तेलबिया सुधारीत तंत्रज्ञान, दिनांक २५ जून रोजी विकेल ते पिकेल या मोहीमा राबविण्यात आलेल्या असून, दिनांक २८ जून रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार मोहीम राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातील फळपिके उत्पादक निवडक शेतकरी प्रातिनिधीक स्वरुपात उपस्थित
राहणार असून, राज्यभरातील शेतकरी ऑनलाईन पध्दतीने सहभाग घेणार आहेत. सदरील कार्यक्रमाचे ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण कृषि विभागाच्या यु ट्युब चॅनलद्वारे
येणार आहे. यासाठी
www.youtube.com/cIAgricultureDepartmentGoM या लिंकवर क्लिक करुन ऑनलाईन जॉईन होणेसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांस कार्यक्रमाची लिंक उपलब्ध झाली नसल्यास नजीकच्या कृषि
अधिकारी यांचेशी संपर्क करुन कार्यक्रमास सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, पुणे विभाग, पुणे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,अहमदनगर यांनी केले आहे.