जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगेश (दादा) आजबे मैदानात, आक्रोश मोर्चा व रास्तारोको आंदोलनाचे आयोजन
शेतकरी प्रश्नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सरकारला घेरणार आहे. कांद्यावरील निर्यात बंदी, दूधाचे पडलेले दर यामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच शासनाला शेतकर्यांचा आक्रोश दिसावा यासाठी येत्या २७ डिसेंबर रोजी जामखेड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील खर्डा चौकात भव्य असा आक्रोश मोर्चा व रास्तारोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या आंदोलनात हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख मंगेश (दादा) आजबे यांनी केले आहे.
शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी सध्या मेटाकुटीला आला आहे, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केली आहे. दुधाला भाव नाहीत, शेतकऱ्यांना अनुदान मिळाले पाहिजे, तसेच पंचायत समिती व कृषी विभागाचे लाभ शेतकऱ्यांना मिळत नाहीत. अशा विविध मागण्यांसाठी व शासनाला शेतकर्यांचा आक्रोश दिसावा यासाठी येणार्या २७ डिसेंबर रोजी जामखेड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील खर्डा चौकात भव्य असा आक्रोश मोर्चा व रास्तारोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या आंदोलनात हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख मंगेश (दादा) आजबे यांनी केले आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख मंगेश आजबे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी, दुधाला हमीभाव पन्नास रुपये जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी मिळावी, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या 2 लाखा वरील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, जे शेतकरी 50 हजार प्रोत्साहन पर अनुदानात वंचित राहिले आहे, अश्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान द्यावेत.
जामखेड नगरपरिषद हद्दीतील शहर अंतर्गत असलेल्या गावांना ग्रामीण भागाप्रमाणे कृषी विभाग, पंचायत समिती योजनेंचा लाभ मिळावा, जामखेड तालुक्यामध्ये अजून पर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना, 25% अग्रीम पीक विम्याचे वाटप झालेले नाही तरी ते तात्काळ मिळावी, वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षणासाठी तार कुंपण करण्यास शंभर टक्के अनुदान द्यावे, शेतकऱ्यांचे वीज बिल पूर्णपने माफ करावे, गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी (पावसामुळे) पिकांचे नुकसान झालेल्या 35 गावांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी आशा मागण्या करण्यात आल्या आहेत.