वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जैन संघास दोन मजली इमारत बांधून देणार – शांतीलालजी गुगळे

0
228
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
येथील प्रसिद्ध कापड व्यवसायिक शांतीलालजी गुगळे यांनी आपले पिताश्री दिवंगत उत्तमचंदजी गुगळे यांच्या स्मरणार्थ जामखेड शहरातील जैन श्रावक संघाचे जूने जैनस्थानकासाठी दोन मजली इमारत बांधून देणार असल्याचे आज जाहीर केले. जामखेडच्या वैभवात भर व जैन समाजाला प्रेरणादायी ठरेल असे काम असून या कामामुळे श्रीमान शांतीलाल गुगळे आणि त्यांच्या परिवारांचा जैन श्रावक संघाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
      आपल्या दानशूर प्रवृतीसाठी नेहमीच तत्पर असलेले
दानवीर शांतीलालजी गुगळे यांनी जुन्या जैन स्थानकाच्या मालकीची  पाच वर्षापासून मोकळी पडलेली जागा व त्याची समाजासाठी असलेली गरज ओळखून त्या जागेवर जैन समाजासाठी काहीतरी उपयोग व्हावा. असे वाटल्याने त्यांनी त्यांची दोन्ही मुले  आनंद व जितेंद्र यांचा विचार घेऊन याठिकाणी पिताश्री उत्तमचंदजी गुगळे यांच्या स्मरणार्थ दोन मजली इमारत बांधून देण्याचा निर्णय घेतला व आज दि. २७ जून रोजी जैन श्रावक संघाचे संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, सेक्रेटरी दिलीप गुगळे,. पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, आसराज बोथरा, प्रशांत बोरा, अभय गांधी, संदीप बोगावत आदींच्या उपस्थितीत दोन मजले पूर्णपणे बांधून देण्याचे सर्वांसमक्ष जाहिर केले.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना शांतीलालजी गुगळे म्हणाले की सदर इमारत आई-वडीलांच्या ऋणांचं उत्तरदायित्व म्हणून त्यांचा स्मरणार्थ बांधून देण्याच्या विचारातून मी हा निर्णय घेतला आहे. असे मत यावेळी शांतीलालजी गुगळे यांनी मांडले
      यावेळी संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी म्हणाले की, हे काम करून तुम्ही खूप मोठे सत्कार्य करत आहात.  त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्ही समक्ष उभा राहून काम करून घेऊ. तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले की, काकांनी आम्हाला  पहिल्या मजल्यावर भोजन व्यवस्था आणि दुसऱ्या मजल्यावर अतिथी भवन बांधून देतो असे जाहीर केले असून यामुळे जामखेडच्या वैभवात भर तर पडणारच आहे. त्याबरोबरच  जैन समाजाच्या साधुसंतांच्या दर्शनासाठी आलेल्या लोकांची व्यवस्था होईल. यावेळी या वास्तूतून गोरगरिबांना आणि गरजूंना अल्पदरात भोजन द्यावे असे पण यावेळी ठरले आहे.
यावेळी आसराज बोथरा म्हणाले की, शांतीलालजी गुगळे यांनी दिलेल्या शब्दाला समाज कायम ऋणी राहील असे मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here