मनकर्णिका घाटावरील मंदिरे व ऐतिहासिक वास्तू तोडफोडीचा जामखेड श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जाहीर निषेध अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले मनकर्णिका घाटावरील तोडफोड तात्काळ थांबवावीत
मनकर्णिका घाटावरील मंदिरे व ऐतिहासिक वास्तू तोडफोडीचा जामखेड श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जाहीर निषेध
अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले मनकर्णिका घाटावरील तोडफोड तात्काळ थांबवावीत
वाराणसी येथे गंगा नदीच्या काठावर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले मनकर्णिका घाटावरील मंदिरे व ऐतिहासिक वास्तू सुधारण्याच्या नावाखाली तोडण्यात आल्याबाबत जामखेड श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले मनकर्णिका घाटावरील तोडफोड तात्काळ थांबवावी असे निवेदनात म्हटले आहे.
तसे निवेदन पांडुरंग मधुकर भोसले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार जामखेड यांना देत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, हिंदू धर्माच्या श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या वाराणसी येथील गंगा नदीच्या काठावर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले मनकर्णिका घाटावरील मंदिरे व ऐतिहासिक वास्तू या भारताच्या धार्मिक व सांस्कृतिक वारसाचा अमूल्य ठेवा आहेत.
सध्या सुधारणा -विकास कामांच्या नावाखाली या प्राचीन मंदिरे व वास्तू तोडण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह व हिंदू समाजाच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवणारी आहे. शेकडो वर्षांचा इतिहास, परंपरा व श्रद्धा जपणाऱ्या या वास्तू नष्ट करणे म्हणजे आपल्या सांस्कृतिक वारसावर घाला घालण्यासारखे आहे.
तरी सदर प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करीत असून, संबंधित प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन ऐतिहासिक व धार्मिक वास्तूंचे संरक्षण करावे तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले मनकर्णिका घाटावरील तोडफोड तात्काळ थांबवावी, ही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले, शरद फरांडे, पांडुरंग माने, भैय्या खरात, नितीन राऊत, ऋषिकेश सोनवने, संजय खरात, मनिष मासाळ, सचिन काशिद, नितीन खेत्रे, आदित्य थोरात, नाना इंगळे, भाउ पोटफोडे, आदित्य राजगुरु, संतोष शिंदे, मनोज राळेभात, अनिल बिराजदार, अँड महारूद्र नागरगोजे सह मोठ्या प्रमाणात धारकरी बंधु उपस्थित होते.