आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत शस्त्रक्रिया गृहात होणार मोफत शस्त्रक्रिया

0
327
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – (सुदाम वराट) – 
         
        राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघाबरोबरच राज्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी केलेले काम मोठे आहे.कर्जत-जामखेड बरोबरच आसपासच्या तालुक्यातील नागरीकांच्या आरोग्यासाठी आता त्यांनी पुन्हा एकदा महत्त्वपुर्ण पाऊल उचलले आहे. कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत शस्त्रक्रिया गृह(ऑपरेशन थेटर) उभारण्यासाठी त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातुन १ कोटी ४२ लक्ष रुपयांचा निधी मंजुर करून आणला आहे.त्यामुळे ग्रामिण भागातील नागरिकांसाठी ही आरोग्यदायी पर्वणीच आहे.सध्यस्थीतीला नागरिकांच्या आजाराचे निदान झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना नगर, पुणे, मुंबई अशा शहरी भागातील खाजगी रुग्णालयात जाण्याची नामुष्की येत होती. असे असले तरी आर्थिकदृष्ट्या प्रबळ नसलेल्या नागरीकांना त्यासाठी लागणारा वेळ, यात होणारा खर्च पेलवणारा नसतो प्रसंगी अनेकांना आपल्या जीवलाही मुकावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन आ.रोहित पवारांनी मंजुर करून आणलेल्या शस्त्रक्रिया गृहामुळे अनेकांना नवजीवन मिळणार आहे.
         रुग्णांच्या सामान्य शस्त्रक्रियांबरोबरच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील स्थानिक पातळीवर यशस्वी पार पडणार आहेत.अद्ययावत शस्त्रक्रिया गृहामुळे कर्जतच्या रुग्णालयास महत्व प्राप्त होणार असुन आरोग्य आणि सुरक्षितता,अद्ययावत शस्त्रक्रिया साहित्य,अल्पखर्चिक उपचार नियोजन व व्यवस्थापन,पर्यावरणीय अनुकुल पद्धत यासारख्या अनेक बाबींनी परिपुर्ण असलेल्या या शस्त्रक्रिया गृहाचे नागरिकांना फायदे होणार आहेत.सर्व सुविधा कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात मोफतच मिळणार असल्याने रुग्णांसाठी ही आनंदाची बाब आहे.आ. रोहित पवारांनी कोरोना काळातही आरोग्यासाठी लागणारी उपकरणे व सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत.इथल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी असलेली त्यांची तळमळ आणि त्यांनी घेतलेली काळजी दिलासा देणारी ठरली आहे.आ.पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात पहिल्यांदाच सुरू होणाऱ्या अभिनव उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
   चौकट
‘मतदारसंघात आरोग्याबाबत असलेल्या सुविधांचा तुटवडा भरून काढण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया करण्यासाठी नागरीकांना आता शहरी भागात जाण्याची गरज भासणार नाही शिवाय त्यांचा वेळ आणि होणारा खर्चही वाचणार आहे याचे मला समाधान वाटते.या कामासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ,जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले त्यांचे मी आभार मानतो’
                  आमदार रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here