गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी मध्ये मिळवून दिली सवलत
आकाश बाफना यांचे सामाजिक काम उल्लेखनीय आहे. शहरासह वाडी वस्तीवर मुरमीकरण, लाईटची सोय यासह अनेक कामे मार्गी लावलेली आहेत. आता गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी मध्ये मदत करत सामाजिक कार्याचा वसा चालूच ठेवलेला आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
जामखेड तालुक्यातील गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक शिक्षणासाठी मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य मा. आकाश शेठ बाफना यांनी केले आहे.
प्रथमेश सुनिल जगताप, रा. जामखेड, जि. अहिल्यानगर हा विद्यार्थी अमोलोक जैन इंजिनिअरींग कॉलेज, कडा, ता. जि. बीड येथे इंजिनिअरिंगचे चार वर्षांचे शिक्षण घेत आहे. सदर शिक्षणाची वार्षिक फी एक लाख रुपये असून विद्यार्थ्याच्या शिक्षण करिता आर्थिक मदत अत्यंत गरज आहे.
प्रथमेशचे वडील सुनिल अर्जुन जगताप हे फोटो ग्राफर असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.या परिस्थितीत आपल्या मुलाच्या शैक्षणिक फीमध्ये सवलत मिळावी यासाठी त्यांनी मा. आकाश शेठ बाफना यांच्याकडे विनंती केली. सदर विनंतीची दखल घेत आकाश शेठ बाफना यांनी संबंधित महाविद्यालयाशी पाठपुरावा करून विद्यार्थ्याच्या वार्षिक फीमध्ये मोठी सवलत मिळवून दिली.
त्यांच्या प्रयत्नांमुळे वार्षिक एक लाख रुपये असलेली फी सत्तर हजार रुपये करण्यात आली असून, त्यामुळे विद्यार्थ्याला प्रतीवर्ष ३० हजार 4 वर्षा साठी 1 लाख 20 हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. या मदतीमुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न सुटला असून कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
या सामाजिक कार्याबद्दल सुनिल जगताप यांनी सांगितले सर्वसामान्य गोर गरीब माणसाची जाण ठेवणारे आकाश शेठ बाफना यांचे मनःपूर्वक आभार मानले व पेढे देऊन सत्कार केला.