जामखेड न्युज——
कर्जत- जामखेड MIDC वरून काका पुतण्या समोरासमोर
कर्जत-जामखेडमधील एमआयडीच्या मुद्द्यावरून
सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. आतापर्यंत रोहित पवार व राम शिंदे यांच्यात वाकयुध्द सुरू होते आता अजित पवार यांनी यात लक्ष घातले आहे यामुळे आता काका पुतण्या वादाचा दुसरा अध्याय सुरु होत आहे.
शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांचा गट बाहेर पडत सरकार मध्ये सहभागी झाले यामुळे काका पुतण्या यांच्यात पहिला संघर्ष सुरू झाला आणि आता एमआयडीसी वरून काका अजित पवार व पुतण्या रोहित पवार यांच्यात संघर्षाचा दुसरा पर्याय सुरू होत आहे.
कर्जत जामखेड एमआयडीसी बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, ‘मग मी काय करू’ असं उत्तर दिलं आहे. तसेच, ‘राम शिंदे सांगतील, त्या पद्धतीनं कर्जत एमआयडीसीचा प्रश्न सुटेल असं अजित पवारांनी म्हटले आहे.
यावर आता रोहित पवार म्हणाले, “राम शिंदे सांगतील, तसं व्हावं. पण, हजार एकरापेक्षा कमी परिसरात एमआयडीसी नको. कर्जतमध्ये बऱ्याच ठिकाणी माळढोक पक्षाचा आणि जंगलाचा प्रश्न आहे. आम्ही निवडलेल्या जागी मोठ्या कंपन्या येऊ शकतात. मात्र, ही जागा बदलली, तर फक्त गोडाऊनच होऊ शकतात. त्यामुळे जास्त लोकांना नोकरी मिळू शकणार नाही.
आम्हीही शांत बसणार नाहीत – रोहित पवार
आम्ही अभ्यास करून घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्याबाबत अजित पवार लक्ष घालतील. पण, निर्णय चुकला, तर आम्ही शांत बसणार नाही.अशा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले
“राम शिंदे सांगतील, त्या पद्धतीनं कर्जत एमआयडीची प्रश्न सुटेल. नियमाच्या चौकटीत बसून तो मुद्दा सोडवावा लागेल. तिथं तरूण-तरूणींना रोजगार कसा मिळेल, याचा विचार केला पाहिजे. त्याठिकाणी गुंतवणूक कशी होईल, यासाठी महायुतीचा प्रयत्न चालला आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.
कर्जत जामखेड एमआयडीसी वरुन आता काका अजित पवार व पुतण्या रोहित पवार यांच्यात चांगलाच कलगीतुरा सुरू होईल असे दिसून येत आहे.