जामखेड न्युज——
शालेय जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत जामखेडच्या खेळाडूंची सुवर्ण कामगिरी
सहा सुवर्णपदक व दोन रजत पदक पटकावले
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या वतीने १४ डिसेंबर रोजी शालेय जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धेमध्ये जामखेडच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रेसिडेंट निलेश शेलार यांचे मार्गदर्शन लाभले स्पर्धेसाठी सचिन मकासरे, गोकुळ सोलाट, महिंद्रा कुसळकर, जयेश आनंदकर, थापा इत्यादी मान्यवर होते.
जामखेडचे खेळाडू सहा गोल्ड दोन सिल्वर मेडल पटकावले सहभागी झालेले विद्यार्थी संकेत जमदाडे गोल्ड मेडल योगेश वाघमोडे गोल्ड मेडल ऋतुराज हुलगुंडे गोल्ड मेडल वैष्णवी सातपुते गोल्ड मेडल शिवानी वीर गोल्ड मेडल साक्षी गायकवाड गोल्ड मेडल सानिका हुलगुंडे सिल्वर मेडल सार्थक राऊत सिल्वर मेडल यांना मार्गदर्शन करताना जमदाडे सर उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये नगर, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, संगमनेर, कोपरगाव, अकोले, राहुरी आदी तालुक्यातील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.
सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची सोलापूर येथे होणाऱ्या पुणे विभागीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.नकत्याच वाडियापार्क अहमदनगर झालेल्या स्पर्धेमध्ये दिनांक१४ डिसेंबर रोजी शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये विजेते वैष्णवी सातपुते सुवर्णपदक, शिवानी वीर सुवर्णपदक, साक्षी गायकवाड सुवर्णपदक, संकेत जमदाडे सुवर्णपदक, योगेश वाघमोडे सुवर्णपदक,
ऋतुराज हुलगुंडे सुवर्णपदक, सानिका हुलगुंडे रजत पदक, समर्थ राऊत रजतपदक एकूण आठ पदके मिळवली आहेत.
सहा सुवर्णपदक दोन रजतपदक जामखेड जामखेड च्या खेळाडूंनी बक्षिसे मिळवले
सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, माऊली जमदाडे, राघवेंद्र धनलगडे,
माकोडे सर, नितीन मोहोळकर यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
वरील खेळाडूंची सोलापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.