जामखेड न्युज——
जि. प. भुतवडा शाळेत यशवंतराव आंबेडकर यांची जयंती शालेय साहित्य वाटप करून केली साजरी
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुतवडा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप करून जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बबन गव्हाळे (तालुका उपप्रमुख), राहुल समुद्र (शिऊर शाखाप्रमुख), किरण सदाफुले ( जिल्हा उपप्रमुख), आकाश सदाफुले (शहर प्रमुख जामखेड), अवि गायकवाड (शाखाप्रमुख भुतवडा), परशुराम बनसोडे (तालुकाप्रमुख जामखेड), मंगेश घोडेस्वार ( सहसचिव), सुरज सदाफुले (जिल्हा सहसचिव शहर संघटक) इत्यादी मानेवर सदरील कार्यक्रमाला उपस्थित राहून यशवंत आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शालेय विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री बळीराम जाधव सरांनी सर्वांचे आभार मानले आणि सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.