कवी इंद्रजित भालेराव यांना संत तुकाराम साहित्य पुरस्कार

0
327

जामखेड न्युज——

कवी इंद्रजित भालेराव यांना संत तुकाराम साहित्य पुरस्कार

 

जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने २०२३ चा संत तुकाराम साहित्य पुरस्कार प्रसिद्ध कवी व लेखक प्रा. इंद्रजित भालेराव यांना जाहीर करण्यात आला आहे.


जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचा २०२३चा ‘ संत तुकाराम साहित्य पुरस्कार ‘ सुप्रसिद्ध कवी व लेखक प्रा. इंद्रजित भालेराव यांना घोषित केल्याची माहिती अध्यक्ष प्रा.आ.य. पवार व सचिव डॉ शत्रुघ्न कदम यांनी दिली.

सदरचा पुरस्कार लेखक कवीच्या उत्कृष्ट वाड्मयीन कार्यांसाठी दिला जातो. रोख ₹१०,०००/-, स्मृतिचिन्ह, सन्मान पत्र व शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी जामखेड येथे संपन्न होणाऱ्या कवितांच्या ‘ चांदणझुला ‘ या कार्यक्रमात संत तुकाराम साहित्य पुरस्काराचे वितरण होईल.


असे प्रा. मधुकर राळेभात म्हणाले.यापूर्वी गझलकार प्रा.तुकाराम पाटील, चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर,कथा लेखिका डॉ.प्रतिमा इंगोले आणि आकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार सदानंद देशमुख यांना संत तुकाराम साहित्य पुरस्कार देऊन गौरविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here