जामखेड न्युज——
मिनाक्षी कुलकर्णी यांची कनिष्ठ सहायक पदावर नियुक्ती
जामखेड तालुक्यातील पंचायत समिती गेली अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या श्रीम. मिनाक्षी कुलकर्णी यांची कनिष्ठ सहायक पदावर जिल्हा परिषद अहमदनर चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष येरेकर यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे .
मिनाक्षी कुलकर्णी या अतिशय मेहनती व नम्र स्वभावाच्या म्हणून परिचित आहेत. आपल्या कामाचा ठसा निर्माण केला आहे.
अतिशय कामसू , मेहनती व नम्र स्वभावाच्या म्हणून परिचित असलेल्या श्रीम. मिनाक्षी कुलकर्णी यांची पदोन्नतीने जामखेड येथेच पंचायत समितीत कनिष्ठ सहायक पदावर सामान्य प्रशासन विभागत नियुक्ती झाली आहे.
त्यांच्या या नियुक्ती बदद्ल जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. प्रकाश पोळ , गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे व इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.