मराठा क्रांती मोर्चा व भीमसैनिकांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

0
389

जामखेड न्युज——

मराठा क्रांती मोर्चा व भीमसैनिकांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

मराठा आरक्षणासाठी व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जामखेड मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या त्रेचाळीस दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. आज त्रेचाळीसाव्या दिवशी बांधखडक गावाचा नंबर होता. आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिन यानिमित्ताने जामखेड मराठा क्रांती मोर्चा व समस्त भीमसैनिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रा.मधुकर राळेभात,शहाजी राळेभात, विकास राळेभात,नय्युम शेख, दत्तात्रय सोले, नामदेव राळेभात,मंगेश वारे,तानाजी फुंदे, शांतीलाल वारे,विजय वारे, अंकुश वारे, अवधूत पवार, बौद्धाचार्य अशोक आव्हाड, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, भीम टोला संघटनेचे अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश सदाफुले, प्रा.राहुल आहिरे,पत्रकार संजय वारभोग, मुकंद घायतडक, रणजित मेघडंबर, किशोर सदाफुले,सचिन सदाफुले, दादा घायतडक, रवि सोनवणे, सोनू सदाफुले, दिपक घायतडक,सुहास आव्हाड यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण आज झालं होतं. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली.

भारतातील वर्ग लढ्याला आणि जाती अंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केले होते.

६ डिसेंबर हाच तो दिवस होता, ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. संपूर्ण देशासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य खुपच उल्लेखनीय आहे. म्हणून मराठा क्रांती मोर्चा व भीमसैनिकांच्या वतीने जामखेड येथे अभिवादन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here