बांधखडक शाळेस ज्येष्ठ नागरिक गोरख वारे यांच्याकडून साठ हजार रुपयांची देणगी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या कडून वारे यांचे कौतुक

0
365

जामखेड न्युज——

बांधखडक शाळेस ज्येष्ठ नागरिक गोरख वारे यांच्याकडून साठ हजार रुपयांची देणगी

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या कडून वारे यांचे कौतुक

 

ग्रामीण भागातील शाळा असुनही गुणवत्तेत अव्वल असणाऱ्या व विविध स्पर्धा व संगीत, क्रीडा या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या बांधखडक शाळेची प्रगती पाहून प्रेरीत झालेले ज्येष्ठ नागरिक गोरख वारे यांनी शाळेस क्रीडा व कवायत साहित्यासाठी साठ हजार रुपयांची मदत केली आहे यामुळे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी वारे यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे. व इतर पालकांनी शाळेस सहकार्य करण्याचे आवाहन धनवे यांनी केले आहे.

दुष्काळग्रस्त परिस्थितीशी सामना करताना जीवनात अत्यंत कष्टप्रद व संघर्षजन्य प्रसंगांना सामोरे जावे लागले.अशाही परिस्थितीवर मात करून मुलगा नितीन याला जिद्दीने घडवले, शिकवले व सुसंस्कारित केले. महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील उपसंचालक कार्यालयात तो सध्या कार्यरत आहे.बांधखडक शाळेतील शिक्षकवृंदांनी शाळेसाठी संगीत,क्रीडा व कवायत साहित्यांची गरज असून ते दानशूर व्यक्तिंनी द्यावे असे आवाहन केल्यामुळे मुलाला सदर साहित्य पाठवून देण्याची सूचना करताच त्याने तात्काळ पुणे येथून क्रीडा व कवायत साहित्य तर अहमदनगर येथून दर्जेदार संगीत साहित्य विकत घेऊन पाठविले.


सदर साहित्य सुमारे ६०,००० रू.किंमतीचे असून क्रीडा व कवायतसाहित्यात २बाॅक्सिंग किट, २कॅरमबोर्ड,४बॅडमिंटनसंच,२बुद्धिबळपट,२खो-खोचे खांब,२०रिंगा,१क्रिकेट साहित्यसंच, १फुटबाॅल, ६०डंबेल्स,१भाला,१गोळा व १थाळी इ.चा समावेश असून संगीत साहित्यात हार्मोनियम, तबला, ढोल, हलगी,खंजिरी,ट्रॅंगल व करताल यांचा समावेश आहे.हे साहित्य सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाळेला समर्पित करताना मनस्वी आनंद होत असून विद्यार्थ्यांनी या सर्व साहित्याचा सुयोग्य वापर करून आपल्यातील कलागुणांचा विकास करावा तसेच बाहेरगावी नोकरी व्यवसायानिमित्त असलेल्या भूमीपुत्रांनी शाळेला अधिकाधिक सहकार्य करावे असे आवाहन बांधखडक येथील शिक्षणप्रेमी तथा दानशूर ज्येष्ठ नागरिक गोरख वारे यांनी सत्कारानंतर केले.

यावेळी बांधखडक ग्रा.पं.चे सरपंच राजेंद्र कुटे,उपसरपंच तानाजी फुंदे पाटील, माजी सरपंच केशव वनवे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय वारे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शांतीलाल वारे, अंकुश वारे,दादासाहेब वनवे,अरविंद घोडके,बाबासाहेब वारे,मंगेश वारे,वनवेवस्ती शाळेचे मुख्या.नितीन जाधव यांच्यासह पालक,ग्रामस्थ व महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विकास सौने यांनी केले,तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदर्श शिक्षक मनोहर इनामदार यांनी केले.

अत्यंत कष्टप्रद व संघर्षजन्य परिस्थितीवर मात करून सातत्याने शाळेला सहकार्य करणा-या गोरख दिगंबर वारे व सौ.रंजना गोरख वारे या शिक्षणप्रेमी दानशूर दांपत्याचे तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे ,खर्डा बीटचे शिक्षणविस्तार अधिकारी केशव गायकवाड व नायगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश मोहिते यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here