“ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है; येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता येणार – सभापती शरद कार्ले जामखेड येथे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने फटाके फोडून आनंदाचा जल्लोष

0
462

जामखेड न्युज——

“ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है; येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता येणार – सभापती शरद कार्ले

जामखेड येथे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने फटाके फोडून आनंदाचा जल्लोष

 

चार राज्यातील निवडणुकांचे कल हाती आले आहेत. त्यापैकी तीन राज्यात भाजपला बंपर विजय मिळताना दिसत आहे. आज रोजी जामखेड भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरात नगर रोड येथे आनंदाचा जल्लोष फटाक्यांच्या आतिषबाजीत उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी सभापती कार्ले म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज तीन राज्यांमध्ये सत्ता आल्याने जनतेने टाकलेल्या विश्वास व विकासाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. फटाके फोडून आनंदाचा जल्लोष साजरा केला.

यावेळी सभापती शरद कार्ले म्हणाले की,
“ये तो ट्रेलर है ,पिक्चर अभी बाकी है ,तसेच या निवडणुक प्रचारात आमचे नेते आमदार प्राध्यापक राम शिंदे यांचाही खारीचा वाटा आहे. असा विश्वास व्यक्त केला.

आण्णा ढवळे म्हणाले की, देशाला प्रगतीकडे नेण्याचे कार्य देशाचे आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिसून येते हाच विश्वास जनतेने ठेवून तीनही राज्यात सत्ता स्थापन करण्याचा आपल्या मतातून कौल दिला आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

लोकप्रिय आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी यांनी निवडणुकीत प्रचार प्रमुख म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली याबद्दल मनस्वी आनंदोत्सव आज रोजी पदाधिकारी व कार्यकर्त्यां समवेत साजरा केला.

यावेळी नगरसेवक भाजपा शहराध्यक्ष बिभिषण (मामा) धनवडे, सभापती पै. शरद कार्ले, पोपट (नाना) राळेभात, प्रा. संजय राऊत, गोरख धनवट, अनिल यादव, युवा नेते आण्णासाहेब ढवळे,प्रविण बोलभट,‌विष्णु गंभिरे, उद्धव हुलगुंडे, डॉ विठ्ठल राळेभात, आमदार प्रा.राम शिंदे युवा मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पांडुरंग माने,शहर उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, दादा महारनवर, विलास मोरे, भैय्या पवार, राजु शिंगणे, तुषार बोथरा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here